Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कढीपत्ता खा, कोलेस्टेरॉल आणि डायबिटीस नियंत्रणात येईल! रिसर्चचा दावा, कढीपत्ता रोजच खावा

कढीपत्ता खा, कोलेस्टेरॉल आणि डायबिटीस नियंत्रणात येईल! रिसर्चचा दावा, कढीपत्ता रोजच खावा

भारतात आणि श्रीलंकेत कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग हा आतड्यांसंबधीच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी केला जातो. पण कढीपत्त्याचा शास्त्रीय स्तरावर झालेला अभ्यास सांगतो की कढीपत्ता फक्त इतक्याच मर्यादित फायद्यांसाठी औषधी नसून कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 02:06 PM2021-08-25T14:06:40+5:302021-08-25T14:13:43+5:30

भारतात आणि श्रीलंकेत कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग हा आतड्यांसंबधीच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी केला जातो. पण कढीपत्त्याचा शास्त्रीय स्तरावर झालेला अभ्यास सांगतो की कढीपत्ता फक्त इतक्याच मर्यादित फायद्यांसाठी औषधी नसून कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो

Curry Leaves for health: Eat curry leaves, cholesterol and diabetes will be controlled! Research claims that eating curry leaves daily is beneficial | कढीपत्ता खा, कोलेस्टेरॉल आणि डायबिटीस नियंत्रणात येईल! रिसर्चचा दावा, कढीपत्ता रोजच खावा

कढीपत्ता खा, कोलेस्टेरॉल आणि डायबिटीस नियंत्रणात येईल! रिसर्चचा दावा, कढीपत्ता रोजच खावा

Highlightsकढीपत्त्यात मोठ्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असल्याने आरोग्य निरोगी राखण्यास कढीपत्त्याचा उपयोग होतो.कढीपत्त्याचं सेवन नियमित केल्यास हदय रोगाशी संबंधित उच्च कोलेस्टेरॉलचा धोका टळतो. कढीपत्त्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्याचा उपयोग वजन कमी होण्यासही होतो.

भारतीय आहारपध्दती आणि वेगवेगळ्या वनस्पती यांचा घनिष्ठ संबंध आहे. या वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या कारणांसाठी पदार्थात वापरल्या जातात. काहींचा उपयोग केवळ पदार्थ सजवण्यासाठी असतो , तर काहींचा उपयोग हा खास चवीसाठी असतो तर काही वनस्पतींचा उपयोग औषधी आहेत म्हणून केला जातो. तर काहींचा उपयोग स्वाद आणि औषधी गुणधर्म यासाठी केला जातो. कढीपत्ता हा प्रामुख्याने वापरला जातो तो स्वादासाठी आणि त्यातील औषधी गुणधर्मांचा उपयोग आहाराद्वारे शरीराला होण्यासाठी.

चटणी, सांबार, आमटी यांना वरुन तडका द्यायचा असेल तर कढीपत्ता हा आवश्यकच असतो. कढीपत्ता केवळ पदार्थाची चव वाढवत नाही तर एकूण आरोग्य चांगलं राखण्यासही मदत करतो. कढीपत्ता हा ताजा पानांच्या स्वरुपात वापरला जातो तसेच कढीपत्ता वाळवून त्याची पूड करुनही तीही स्वयंपाकात किंवा औषध म्हणून वापरली जाते. भारतात आणि श्रीलंकेत कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग हा आतड्यांसंबधीच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी केला जातो. पण कढीपत्त्याचा शास्त्रीय स्तरावर झालेला अभ्यास सांगतो की कढीपत्ता फक्त इतक्याच मर्यादित फायद्यांसाठी औषधी नसून कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो.

छायाचित्र- गुगल

कढीपत्ता आरोग्यदायी कसा?

कढीपत्त्याबद्दलचं संशोधन सांगतं की कढीपत्त्यात नत्रयुक्त घटक आणि फेनॉलिक घटक असतात. जे आरोग्याचं संरक्षण करण्यास महत्त्वाचे ठरतात. कढीपत्त्यात मोठ्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असल्याने आरोग्य निरोगी राखण्यास कढीपत्त्याचा उपयोग होतो.
कढीपत्त्यात अ,ब, क आणि इ ही जीवनसत्त्वं असल्याने शरीराला फ्री रॅडिकल्स पासून सुरक्षित ठेवण्यासाठी, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी कढीपत्त्यातील या गुणधर्मांचा उपयोगी होतो. फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यामुळे गंभीर आजार ओतात. या आजारांपासून कढीपत्ता आरोग्याचं रक्षण करण्यास सर्मथ आहे.

2014 मधे उंदराच्या दोन गटांवर एक अभ्यास करण्यात आला. एक गट असा होता ज्यात उंदरांचं पोट खराब होतं. या या उंदरांच्या गटाला कढी पत्याचा अर्क तोंडावाटे देण्यात आला. याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला असता त्यांच्यात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस दिसून आला नाही तसेच पोटातील आतड्यांच्या पेशीत त्रासदायक असा कोणताच बदल दिसून आला नाही.
कढीपत्त्याचं सेवन नियमित केल्यास हदय रोगाशी संबंधित उच्च कोलेस्टेरॉलचा धोका टळतो. याचं कारण म्हणजे कढीपत्त्यातील गुणधर्मांमुळे ऑक्सिडेटिव्ह ताणही कमी होतो.
उंदरांवर आणखी एक 12 आठवड्यांचा अभ्यास केला केला. हे उंदीर अति मेदयुक्त अन्न खात होते. पण त्यांना नियमित स्वरुपात कढीपत्त्याचा अर्क दिल्यानंतर मेदयुक्त आहरामुळे निर्माण होणार्‍या गुंतागुंतीपासून हे उंदीर सुरक्षित राहिल्याचे आढळून आलं. कढीपत्त्याच्या अर्काच्या सेवनानं चरबी निर्माण होणं, दाह, सूज तसेच ऑक्सिडेटिव्ह ताणही आढळून आला नाही. हे सर्व घटक हदयरोगास कारणीभूत ठरतात. या अभ्यासावरुन असा निष्कर्ष निघाला की कढीपत्त्याचं सेवन हदयाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी होतो.

छायाचित्र- गुगल

टाइप 2 मधुमेहावरही प्रभावी.

कढीपत्त्यात अँण्टिऑक्सिडण्टस आणि जीवनसत्त्वं तर असतातच शिवाय कढीपत्त्यात फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. त्याचा उपयोग अन्नाचं पचन संथ गतीनं होण्यास होतो. अन्न लवकर पचण्यास कढीपत्त्यामुळे प्रतिबंध होतो. याचा फायदा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि इन्शुलिनचं कार्य सुधारण्यास होतो.
मधुमेह असलेल्या उंदरांवर एक 30 दिवसांचा अभ्यास केला गेला. या अभ्यासात उंदरांना कढीपत्त्याचा अर्क तोंडावाटे देण्यात आला. त्या उंदरांमधील ग्लुकोजची पातळी कमी आढळून आली. यासोबत हा अभ्यास सांगतो की मधुमेहावरील इतर औषधांपेक्षा कढीपत्त्याचा अर्क जास्त प्रभावी रीतीने काम करत असलेला आढळला.
या अभ्यासानंतर काही प्रयोग हे 43 मधुमेही रुग्णांवरही केले गेले. या प्रयोगात रुग्णांना कढीपत्त्याची पावडर सकाळी आणि रात्री देण्यात आली. हा प्रयोग तीस दिवस करण्यात आला. पहिल्या दिवसापासून ते 30 व्या दिवसापर्यंत या मधुमेही रुग्णांमधे रक्तातील साखरेची पातळी कमी झालेली आढळून आली.
अशा या बहुगुणी कढीपत्त्यात कॅन्सर विरोधी, जीवाणूविरोधी आणि वेदना शमवणारे घटक असतात. कढीपत्त्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्याचा उपयोग वजन कमी होण्यासही होतो.

छायाचित्र- गुगल

कढीपत्त्याचा चहा

कढीपत्त्याचे हे सर्व गुणधर्म वाचल्यानंतर आणि कढीपत्त्याबद्दल झालेला शास्त्रीय अभ्यास समजून घेतल्यानंतर आपल्यालाही कढीपत्त्याचं सेवन करण्याची निश्चितच इच्छा होईल. त्यासाठी कढीपत्त्याची ही एक सोपी रेसिपीहा चहा करण्यासाठी 20 -25 कढीपत्त्याची पानं आणि एक कप पाणी घ्यावं. चहा करताना आधी कढीपत्त्याची पानं नीट धुवून घ्यावीत. एका भांड्यात कपभर पाणी उकळण्यास ठेवावं आणि त्यात कढीपत्ता घालावा. पाच मिनिटानंतर पाण्याला चांगली उकळी फुटलेली असेल. तेव्हा गॅस बंद करुन द्यवा आणि थोडा वेळ कढीपत्ता तसाच पाण्यात राहू द्यावा. पाण्याचा रंग बदललेला दिसाला की लगेच चहा लगेच गाळून घ्यावा. आणि तो गरम असतानाच प्यावा. यात चवीसाठी थोडा लिंबाचा रस आणि मध घातलं तरी चालतं. कढीपत्त्याचा हा चहा सकाळी रिकाम्या पोटी आणि झोपण्याआधी दोन वेळा घ्यावा. 

Web Title: Curry Leaves for health: Eat curry leaves, cholesterol and diabetes will be controlled! Research claims that eating curry leaves daily is beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.