Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मेंदूचं नुकसान करणाऱ्या 'या' ५ सवयी; स्मरणशक्ती होते कमी, विसरभोळेपणाही वाढतो

मेंदूचं नुकसान करणाऱ्या 'या' ५ सवयी; स्मरणशक्ती होते कमी, विसरभोळेपणाही वाढतो

Daily Habbits That Harms Our Brain : मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी संपूर्ण  शरीर चांगले राहणं गरजेचं आहे. मेंदूला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 07:38 PM2024-07-30T19:38:51+5:302024-07-31T15:17:36+5:30

Daily Habbits That Harms Our Brain : मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी संपूर्ण  शरीर चांगले राहणं गरजेचं आहे. मेंदूला

Daily Habbits That Harms Our Brain We Start Our Forgetting Things And Our Memory Get Affected | मेंदूचं नुकसान करणाऱ्या 'या' ५ सवयी; स्मरणशक्ती होते कमी, विसरभोळेपणाही वाढतो

मेंदूचं नुकसान करणाऱ्या 'या' ५ सवयी; स्मरणशक्ती होते कमी, विसरभोळेपणाही वाढतो

आपला मेंदू (Brain) शरीराच्या महत्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. इतराच्या इतर भागांप्रमाणेच मेंदूची काळजी घेणंही महत्वाचे असते. रोजच्या जगण्यातील अशा अनेक सवयी आहेत ज्याचा ब्रेन हेल्थला नकारात्मक स्वरूपात नुकसान पोहोचवतात. (World Brain Day 2024) मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी संपूर्ण  शरीर चांगले राहणं गरजेचं आहे. मेंदूला तन, मनाचं कंट्रोल सेंटर असंही म्हटलं जातं. अशा स्थितीत सावध राहणं फार गरजेचं आहे ब्रेन डॅमेज होण्यासाठी काही सवयी जबाबदार असतात. या सवयी कोणत्या ते समजून घेऊ. (Daily Habits That Harms Our Brain)

मेंदूला नुकसान पोहोचवणाऱ्या सवयी कोणत्या?

१) झोपेची कमतरता

झोपेची कमतरता मेंदूच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेव्हा आपण पुरेशी झोपत घेत नाही तेव्हा ब्रेन व्यवस्थित कार्य करत नाही. ज्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होणं, मानसिक क्षमता कमी होणं,  झोप न येणं अशा समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेमुळे डिप्रेशन, एंजायटी आणि इतर मानसिक समस्या उद्भवू शकतात. 

२)  खाण्यापिण्याच्या सवयी

खराब आहार तुमच्या मेंदूसाठी हानीकारक ठरू शकतो. जास्त शुगर, जंक फूड आणि फॅटी फूड्स खाण्याचा परिणाम मेंदूवर होतो. या पदार्थांमुळे ब्रेन फंक्शनिंगवर परिणाम होतो. ज्यामुळे अल्जायमरसारखे न्युरोलॉजिकल आजार वाढतात.

प्रेग्नंसीनंतर शरीर सुटलं-PCOD त्रास; महिलेनं ३ महिन्यात १५ किलो घटवलं, पाहा कसं

३) जास्त ताण घेणं

जास्त ताण घेणं मेंदूच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. जेव्हा तुम्ही सतत तणावात असता तेव्हा मेंदू कोर्टिसोल सारखे तणावाचे हॉर्मोन्स रिलिज करते. ज्यामुळे ब्रेन सेल्सचे नुकसान होते. ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं, मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पोटभर चपाती खा-वजन भराभर घटेल; पाहा चपाती  खाण्याची योग्य पद्धत

४) फिजिकल एक्टिव्हीटीजमध्ये कमतरता

फिजिकल एक्टिव्हिटीजच्या कमतरतेमुळे मेंदूवर चुकिचा परिणाम होतो. रेग्युलर व्यायाम केल्याने मेंदूचा ब्लड फ्लो वाढतो. जसं की मेंदूची कार्यक्षमता सुधारते. जर आपण फिजिकल एक्टिव्हीटीजपासून दूर झालो तर मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि मेंदूशी संबंधित समस्या उद्भवतात. 

खूप चालता तरी शरीर जसंच्या तसंच? या ५ पद्धतीने चाला, भराभर वजन कमी होईल-मेंटेन दिसाल

५) स्क्रिन टाईम जास्त असणं

जास्तवेळ स्क्रिन समोर बसणं जसं की मोबाईल, कंप्यूटर किंवा टिव्ही जास्तवेळ पाहणं मेंदूच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.  यामुळे फक्त डोळ्यांच्या समस्या उद्भवत नाहीत तर एका ठिकाणी लक्ष केंद्रीत करायला त्रास होतो. डोळ्याचा निळा प्रकाश तुमच्या स्लिप क्वालिटीवर परिणाम करतो. 

Web Title: Daily Habbits That Harms Our Brain We Start Our Forgetting Things And Our Memory Get Affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.