Join us   

एका दिवसात जास्तीत जास्त किती साखर खावी? शरीराला किती साखरेची गरज असते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2024 4:14 PM

Daily Intake of Sugar — How Much Sugar Should You Eat in a day : किती साखर खाल्ल्याने वजन वाढत नाही? साखर पूर्ण बंद करून चालेल का?

आरोग्यासाठी साखर खाणं हानिकारक ठरतं असं तज्ज्ञ सांगतात (Sugar Intake). पण एकदम सारखं खाणं बंद करणं खूप जड जातं. काही वेळेला आपण एक गोष्ट खाणं सोडतो. पण त्या गोष्टीची तलफ लागली की, मनाचा ताबा सोडून आपण पुन्हा खातो. काही लोकांना गोड खायला प्रचंड आवडते (Health Tips). जेवल्यानंतर किंवा, जेवणाआधी गोड पदार्थ नसेल तर, आपण चमचाभर साखर तर खातोच.

साखर जितकी आरोग्यासाठी हानीकारक ठरते, तितकीच फायदेशीर ठरते. पण अति तेथे माती करण्यापेक्षा प्रमाणात साखर खायला हवे. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने १०० कॅलरीजपेक्षा जास्त साखर खाऊ नये. दिवसभरात सुमारे  ६ चमचे किंवा २४ ग्रॅम साखर खावे(Daily Intake of Sugar — How Much Sugar Should You Eat in a day).

भारत म्हणजे साखरप्रेमींचं देश

नोव्हेंबर २०२० साली 'द इकॉनॉमिक टाईम्स' मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारतात साखरप्रेमी अधिक प्रमाणात आढळते. जगाच्या इतर देशांच्या तुलनेत भारत हा देश अधिक प्रमाणात साखर खाते. मेंदूची शक्ती, स्नायूंची उर्जा आणि शरीरातील पेशींचे योग्य कार्य करण्यासाठी साखर हा ऊर्जेचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. परंतु, याचे अतिसेवन अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते.'

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड भरपूर खाल्ले तर वजन कमी होतो? पण कुणाचे-कुणी न खाणंच बरं..

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, शरीराला इतर अन्नपदार्थांप्रमाणेच साखरेमधूनही तितकेच कॅलरीज मिळतात. साखरेतून मिळणारे कॅलरीज लोक व्यायाम करून सहज बर्न करू शकता. साखरेतून शरीराला मिळणारी कॅलरीज योग्यरित्या बर्न झाल्यास कोणतीही हानी होत नाही, पण ज्यांना लठ्ठपणा किंवा इतर आजारांचा धोका अधिक आहे, त्यांनी साखर कमी किंवा खाऊ नये.'

प्रमाण कसे ठरवायचे?

शरीरात होणारे ५ बदल देतात लिव्हर डॅमेजचे संकेत! वेळीच ओळखा - टळेल नुकसान

तज्ज्ञांच्या मते, साखरेचे अधिक प्रमाणात सेवन करण्याची काहीही गरज नाही. त्याची शरीराला आवश्यकताही नाही. जर आपल्याला साखरेशिवाय जमत नसेल तर, शिवाय साखरेची सवय कमी करायची असेल तर, ज्या उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असेल, ते पदार्थ कमी प्रमाणात खा. एक चमचामध्ये ४ ग्रॅम साखर असते. या आधारावर रोजचे साखरेचे प्रमाण ठरवा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य