कोणत्याही वयात शरीर निरोगी आणि तंदरूस्त ठेवण्यासाठी खाण्यापिण्याकडे, झोपेकडे लक्ष देणं महत्वाचं असतं. तुमच्या रोजच्या जीवनातल्या सवयींचा शारीरिक मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. चांगल्या सवयी तब्येत चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. (Daily night routine for health) काही हेल्दी सवयी तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
रोज रात्री झोपण्याआधी ३ टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही फिट राहून स्वत:मध्ये बदल झालेला पाहू शकता. मॅटरनल आणि चाईल्ड न्युट्रिशनिस्ट डॉक्टर रमिता यांनी इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून याबाबत अधिक माहिती दिली आहे. (The Perfect Night-time Anti-ageing Skincare Routine)
१) सकाळची सुरूवात करताना भिजवलेले 5 बदाम, 2 अक्रोड आणि प्रत्येकी 1 चमचे भोपळा आणि सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करा. तसेच तांब्याच्या भांड्यात १ ग्लास पाणी टाकून ठेवा.
बदामाचे फायदे
बदामामध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये प्रथिने तसेच ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन-ई असते. बदामातील व्हिटॅमिन-ए आणि ई तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले असतात. तसेच, बदाम हे अँटिऑक्सिडंट्सचे उत्तम स्त्रोत आहेत आणि जेव्हा आपण त्यांना भिजवतो तेव्हा त्यांचे फायदे अनेक पटींनी वाढतात.
अक्रोडचे फायदे
तांबे, सेलेनियम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक अक्रोडमध्ये आढळतात. हे सर्व पोषक तत्व शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
भोपळा आणि सुर्यफुलाच्या बिया
सूर्यफुलाच्या बियांमध्ये खनिजे, व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम, मॅंगनीज इत्यादी पोषक घटक असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये सूर्यफुलाच्या बियाण्यांपेक्षा किंचित कमी कॅलरी असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस थोड्या जास्त प्रमाणात आढळतात.
२) चांगल्या झोपेसाठी झोपण्याच्या १ तास आधी सर्व गॅजेट्स बंद करा. गॅजेट्समधून येणारा ब्लू लाईट तुमच्या झोपेवर नकारात्मक परिणाम करतो. स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब यांसारख्या गॅजेट्सच्या स्क्रीनमधून येणार ब्लू लाईट झोपेचे हार्मोन मेलिटोनिनवर दबाव टाकते. यामुळे उशीरा झोप येते आणि सतत थकवा जाणतो.
३) डोकं शांत ठेवण्यासाठी कमी प्रकाशात १० मिनिटं दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेतल्यानंतर शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. हा ऑक्सिजन संपूर्ण शरीरात प्रवाहीत होतो. यामुळे शरीरचे सर्व अवयव आपलं काम व्यवस्थित करू शकतात. कारण त्यांना रक्त, ऑक्सिजन आणि आयर्न पुरेश्या प्रमाणात मिळतं. दीर्घ श्वास घेतल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. ताण तणाव कमी होतो. फोकस वाढतो. चांगली झोप घेतल्यानं पचन चांगलं राहतं. याव्यतिरिक्त त्वचेवर ग्लो येतो आणि केस गळणं कमी होतं.