Dehydration : उन्हाळ्यात एक्सपर्ट सतत दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. जेणेकरून शरीर हायड्रेट रहावं. या दिवसांमध्ये जर शरीरात पाणी कमी झालं तर आरोग्याला मोठा फटका बसण्याचा धोका असतो. इतकंच नाही तर पाणी शरीरातील ब्लड सर्कुलेशनसाठी सुद्धा महत्वाचं असतं. पाणी कमी झालं तर हृदयासंबंधी समस्या होतात. हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो. अशात शरीरात पाणी कमी झाल्यावर हृदयाचं कसं नुकसान होतं आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिण्यासोबतच आणखी काय केलं पाहिजे हे जाणून घेऊ.
हार्ट रेटवर पडतो प्रभाव
उन्हाळ्यात सतत जाणारा घाम आणि उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होऊ लागतं. जे लोक दारू पितात, कोल्ड ड्रिंक, सोडा पितात त्यांच्या शरीरात पाणी जास्त कमी होतं. पाणी कमी झालं तर शरीरात ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं. ज्यामुळे ब्लड फ्लो स्लो होतो. ब्लड फ्लो स्लो झाला तर ब्लड पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. ज्यामुळे हार्ट रेट वाढतो. अशात जास्त काळ शरीरात पाण्याची कमतरता राहिली तर हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
बीपी होऊ शकतं लो
पाणी शरीरासाठी खूप जास्त महत्वाचं असतं. कारण पाण्यानं शरीात इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स ठेवण्यास मदत मिळते. जर पाणी कमी झालं तर अर्थातच इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर लोक होऊ लागतं. ब्लड प्रेशर लोक झाल्यानं हार्ट रेट वाढतो. अशात हार्ट फेलिअरचा धोका वाढतो.
समस्या कशी कराल दूर?
उन्हाळ्यात जसजसं तापमान वाढतं जास्तीत जास्त लोक डिहायड्रेशनचे शिकार होतात. यामुळे तर काही लोकांचं जीवही जातो. अशात या दिवसांमध्ये केवळ भरपूर पाणी पिऊन चालणार नाही. तर या दिवसांमध्ये इलेक्ट्रोलाइट वॉटर म्हणजे ओआरएस ORS चं पाणी प्यायला हवं. जर साधं पाणी भरपूर पिण्याचं मन नसेल तर तुम्ही दिवसभर थोडं थोडं लिंबू पाणी आणि ओआरएसचं पाणी पिऊ शकता. या पाण्यामुळं तुमचा डिहायड्रेशनपासून बचाव होऊ शकतो.