रात्री अपरात्री शरीराच्या कोणत्याही अवयवाला वेदना जाणवत असतील तर खूप त्रास होतो. कारण घरात वेदना थांबवण्यासाठी गोळी किंवा औषध नसेल तर काय करावं सुचत नाही. इतक्या रात्री डॉक्टरकडेही जाता येत नाही. त्यामुळे त्रास सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. अशावेळी दात दुखायला लागला तर व्यक्तीला खूप त्रास होतो. दातदुखीच्या तीव्रतेने जाणवत असलेल्या वेदना खूपच त्रासदायक ठरतात. माइक्रो एंडोडोंटिस्ट-इंप्लांटलॉजिस्ट आणि कंसल्टेंट डॉक्टर सौरव बनर्जी यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना रात्री दात दुखल्यास कोणत्या उपायांनी आराम मिळवायचा याबाबत सांगितले आहे.
दातदुखीची अनेक कारणं असू शकतात
मायक्रो एंडोडॉन्टिस्ट डॉ.सौरव बॅनर्जी स्पष्ट करतात की, ''दातदुखी असल्यास आम्ही रुग्णाला न पाहता औषध घेण्याची शिफारस करत नाही. पण जर रात्रीच्या वेळी दातदुखी उद्भवली तर नक्कीच काही उपाय करून पाहावेत. जेणेकरून तात्काळ वेदनांपासून आराम मिळाल्यानंतर दिवसभरात तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करता येतील.''
दात किडल्यामुळे लोकांमध्ये दातदुखी होऊ शकते. तज्ञांचे म्हणणे आहे की दात किडल्यामुळे, कॅव्हिटीजची समस्या बनते. उपचार न केल्यास, रुग्णाला त्रास होतो. जेव्हा कॅव्हिटीज उद्भवतात तेव्हा इनॅमलमधून बॅक्टेरिया आणि एसिड बाहेर पडतात जे दातांच्या टिश्यूंना नष्ट करतात. यामुळे लोकांना वेदना जाणवतात. याशिवाय सायनस संसर्गामुळे अनेकांना दातदुखी उद्भवते. या रोगामुळे त्यांना रात्रीच्या वेळी वेदना होण्याची समस्या असते.
अन्य कारणं
गम डिजीजमुळे
दातांना बुरशी लागल्यामुळे
विसडम टीथ किंवा अडल्ट टीथ आल्यानं (wisdom tooth or adult tooth)
जबड्यात जखम झाल्यानं
हिरड्यांमध्ये पुळ्या, पस जमा झाल्यानं
दातांचे तुकडे पडायला सुरूवात झाल्यास
रात्री जास्त वेदना का होतात?
डॉ.सौरव बॅनर्जी स्पष्ट करतात की, ''कधीकधी दातदुखी प्रसूती वेदनांपेक्षा जास्त असते. हे घडते जेव्हा दातांमध्ये पस जमा होतो. रात्री वेदना होण्याचे कारण असेही आहे की जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा डोक्यात रक्ताभिसरण होते. डोक्यातील जास्त रक्तामुळे, वेदना आणि दबाव वाढतो, ज्यामुळे लोकांना जास्त वेदना जाणवतात.''
थंड पाणी किंवा थंड पदार्थांच्या सेवनानं वेदना होतात
डॉक्टर सांगतात की, ''थंड पाण्यामुळे किंवा अन्नामुळे एखाद्याच्या दातांमध्ये वेदना जाणवत असतील तर त्याने हा उपाय करून पाहावा. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. यामुळे रुग्णाला काही वेळात आराम मिळेल. रात्री विश्रांती घेऊन दुसऱ्याच दिवशी रुग्णाने तज्ञांच्या सल्ल्यासाठी डेटिस्ट्सकडे जावे.''
कॅव्हिटीजमुळे वेदना होत असल्यास हा उपाय करावा
डॉ.सौरव म्हणतात की, ''जर एखाद्याला रात्रीच्या वेळी दातांमध्ये कॅव्हिटीजमुळे वेदना होऊ लागल्या तर त्याने हा उपाय करून पाहावा. लवंगाचे तेल किंवा संपूर्ण लवंगाचा वापर करावा. लवंगाच्या तेलात कापसाचा गोळा बुडवा ज्या ठिकाणी कॅव्हिटीज आहे त्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने रुग्णाला काही तासांसाठी आराम मिळेल. याशिवाय जर घरात लवंगाचे तेल नसेल तर त्याने थेट एक लवंग तिथे ठेवावी. असे केल्यानेही रुग्णाला आराम मिळतो.''
दातात क्रॅक असेल तर...
दात दुखण्याचे कारण जर क्रॅक असेल तर त्या अवस्थेतही तुम्ही त्या ठिकाणी लवंगा ठेवून आराम मिळवू शकता. तात्पुरता समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लोकांनी हा उपाय केला पाहिजे. त्यानंतर त्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
दातात पस असल्यास
जर हिरड्यांमध्ये पसची समस्या असेल तर त्या अवस्थेत डेंटिस्टचा सल्ला घ्यावा. कधीकधी दातांदरम्यान हिरड्यांमध्ये पस असू शकते. जे रुग्णाला दिसून येत नाही. लोकांनी या उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे. डॉक्टर सौरव म्हणतात की ''प्रसूतीच्या वेदनांपेक्षा ही वेदना अधिक तीव्र आहे. यावर उपचार करण्यासाठी, हिरड्यांमध्ये अडकलेला पस काढून टाकून उपचार केले जातात. मग रुग्णाला आराम मिळतो.''