Join us

आता तर आयुष मंत्रालयही सांगतेय, प्रतिकारशक्ती वाढवायची तर शुद्ध देसी घी खा! त्याने काय होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:59 IST

Benefits of eating desi ghee: शुद्ध देसी घी म्हणजेच आपलं साजूक तूप किती गुणकारी आहे हे पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं आहे आयुष मंत्रालयाने.... प्रतिकारशक्ती वाढविण्यासह (immunity booster) आरोग्याच्या इतर अनेक तक्रारींवरचा उत्तम उपाय म्हणजे साजूक तूप...

ठळक मुद्दे लहान मुलांची इम्युनिटी तसेच स्मरणशक्ती  या दोन्ही गोष्टी वाढवायच्या असतील, तर त्यांना साजूक तूप नियमितपणे खायला द्यावे.

गरम भात आणि त्यावर टाकलेलं साजूक तूप, गरम पोळी आणि त्यावरचं साजूक तूप, मस्त गरमागरम पराठे आणि त्याच्या जोडीला साजूक तूप... किंवा साजूक तुपातला शिरा, खीर किंवा लाडू अशी साजूक तुपाची जोड ज्या पदार्थाला दिली, त्या पदार्थाची चवच बदलली.. असे साजूक तुपातले पदार्थ म्हणजे आहाहा... पण वजन वाढेल की काय, या भीतीने अनेक जण साजूक तूप खाणं टाळतात. पण मित्रांनो केवळ वजनाची चिंता करून तूप खाणं (desi ghee is important for health) कमी करू नका... शुद्ध देसी घी दररोज नियमितपणे खा.. असं सांगितलंय आयुष मंत्रालयाने. 

 

हिवाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकला, शिंका, खोकला अशा संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. त्यातच सध्या तर अशी परिस्थिती आहे की कोरोनानेही डोके वर काढले असून आता भारतात कोरोनाची (third wave of corona) तिसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बोरं खा बोरं; महागडी फळं खाता आणि बोरांना नाही म्हणता, मग विसरा ग्लोइंग स्किन..

अशा वातावरणात जर स्वत:ला आणि कुटूंबाला सुरक्षित ठेवायचे असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची गरज आहे. त्यामुळेच हिवाळ्याच्या दिवसात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज शुद्ध देसी घी म्हणजेच साजूक तूप खा असा सल्ला आयुष मंत्रालय (ayush ministry) देत आहे. 

 

साजूक तुपामध्ये ओमेगा ३, ओमेगा ९ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ए, के, ई हे मोठ्या प्रमाणात असते. तसेच शुद्ध तुपात असणारे ब्यूट्रिक ॲसिड रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. इम्युनिटी वाढविण्यासाठी तसेच इतरही अनेक आरोग्यदायी लाभ मिळविण्यासाठी साजूक तूप कसे आणि किती खावे, याविषयीही आयुष मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे...

 

१. अल्सर किंवा जखम झाली असल्यास.. तोंड येण्याची समस्या अनेक जणांमध्ये असते. शुद्ध तुपाचा योग्य वापर करून या समस्येवर रामबाण उपाय करता येतो. तोंड येण्यासोबतच त्वचेवर एखादी जखम झाली असेल तरी हा उपचार करून बघावा. यासाठी थोडेसे साजूक तूप घ्या. त्यात ज्येष्ठमधाची पावडर टाका. त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट तोंडातील अल्सरवर किंवा इतर जखमांवर लावा. जखम लवकर भरून येण्यास मदत होईल.

 

२. भुक लागत नसल्यास... भुकच लागत नाही, अशी अनेक लहान मुलांची तक्रार असते. काही मोठ्या माणसांमध्येही ही समस्या दिसून येते. व्यवस्थित भुक लागावी यासाठी शुद्ध तुपात चुटकीभर हिंग आणि भाजलेले जिरे टाका. हे चाटण लहान मुलांना चाटायला द्या. काही दिवस नियमित हा उपाय केल्यास चांगली भुक लागेल आणि तब्येत सुधारेल. 

 

३. मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी... लहान मुलांची इम्युनिटी तसेच स्मरणशक्ती  या दोन्ही गोष्टी वाढवायच्या असतील, तर त्यांना साजूक तूप नियमितपणे खायला द्यावे. त्यांच्या रोजच्या जेवणात साजूक तुपाचा वापर असायलाच पाहिजे.

 

४. पचन क्रिया सुधारण्यासाठी.. वारंवार अपचन होण्याचा त्रास ज्यांना असतो, त्यांनी हा उपाय करावा. यासाठी रोज रात्री झोपताना एक कप गरम दुध घ्यावे. त्यात ५ मिली साजूक तूप टाकून असे गरम गरम दूध प्यावे. या उपायामुळे पचनाच्या बहुतांश समस्या दूर होतात.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजीकोरोना वायरस बातम्या