Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोण म्हणतं तूप खाल्ल्याने वजन वाढतं? 'या' पद्धतीनं तूप खा- फिट राहाल,तज्ज्ञांचा सल्ला

कोण म्हणतं तूप खाल्ल्याने वजन वाढतं? 'या' पद्धतीनं तूप खा- फिट राहाल,तज्ज्ञांचा सल्ला

Does Ghee Increase Weight : तुम्ही चपातीला किती प्रमाणात तूप लावताय हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कारण कोणताही पदार्थ गरजेपेक्षा खाल्ल्यास तब्येतीला धोका पोहोचतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 09:12 AM2023-09-22T09:12:00+5:302023-09-22T11:23:39+5:30

Does Ghee Increase Weight : तुम्ही चपातीला किती प्रमाणात तूप लावताय हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कारण कोणताही पदार्थ गरजेपेक्षा खाल्ल्यास तब्येतीला धोका पोहोचतो.

Desi Ghee Surprising advantages : Advantage of eating desi ghee with chapati | कोण म्हणतं तूप खाल्ल्याने वजन वाढतं? 'या' पद्धतीनं तूप खा- फिट राहाल,तज्ज्ञांचा सल्ला

कोण म्हणतं तूप खाल्ल्याने वजन वाढतं? 'या' पद्धतीनं तूप खा- फिट राहाल,तज्ज्ञांचा सल्ला

भारतीय घरांमध्ये तूपाचे मुबलक प्रमाणात सेवन केले जाते.  काहीजण चपातीला तूप लावून खातात तर काहीजण वरण भातावर तूप लावून खातात. (Does Ghee Increase Weight?)डाळ खिचडी असो किंवा भाकरी तूपाबरोबर खायला चांगले लागते. तर काहीजण चपातीला तूप लावून खाताना १० वेळा विचार करतात तुपामुळे वजन वाढेल की काय अशी भिती मनात असते. आहारतज्ज्ञ शीनम मल्होत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.(Desi Ghee Surprising advantages)

चपातीला  तूप लावून खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? (Does ghee increase belly fat?)

१) चपातीला तूप लावल्यानंतर चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.  ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.  यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. 

२) ग्लायसेमिक इंडेक्सयुक्त पदार्थांमुळे ब्लड ग्लुकोज लेव्हलवर परिणाम होतो. तूप हार्मोनल संतुलन आणि हेल्दी कोलेस्टेरॉल ठेवण्यासाठी महत्वाचे असते. यामुळे बराचवेळ पोट भरलेलं राहतं.

ऐन तारुण्यात गुडघे-कंबर दुखते! स्वस्तात मस्त प्रोटीन देणारा १ पदार्थ, रस्त्यावर मिळेल १० रुपयांत वाटा

३)  जर तुम्हाला पचनाशी संबंधीत समस्या असतील तर तूपाचे सेवन फायदेशीर ठरते. हे एक प्रकारे ल्युब्रिकेशनप्रमाणे काम करते आणि बॉऊल मुव्हमेंट रेग्युलर करते. जर तुम्हालाही अशा समस्या असतील तुप खाणं फायदेशीर ठरेल.

४) तूप हार्मोनल संतुलनासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फार महत्वाचे असते. जर तुमचं पोट भरलेलं असेल तर तुम्ही जास्त तेलकट, तुपाचे पदार्थ खाणं  टाळता. पचनक्रिया चांगली राहते. ल्युब्रिकेशन व्यवस्थित झाल्याने बॉवेल मुव्हमेंह रेग्लुलेट राहते. 

५) बरेच लोक आपण जाड होऊ, चरबी वाढेल म्हणून चपातीला तूप लावत नाहीत. पण तुम्ही चपातीला तूप लावणं सुरू केलं तर अनेक फायदे मिळतील. 

६) तुम्ही चपातीला किती प्रमाणात तूप लावताय हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कारण कोणताही पदार्थ गरजेपेक्षा खाल्ल्यास तब्येतीला धोका पोहोचतो.

बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट

तूप एक हाय फॅट्सयुक्त पदार्थ आहे. योग्य प्रमाणात याचे सेवन केले नाही तर वजन वाढू सुद्धा शकते. १०० ग्रॅम तूपात जवळपास १०० ग्रॅम फॅट्स असतात. गरजेपेक्षा जास्त तूप खाल्ल्याने वजन वाढू सुद्धा शकते. म्हणून मर्यादित  प्रमाणात तूप खायला हवं. 

Web Title: Desi Ghee Surprising advantages : Advantage of eating desi ghee with chapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.