Join us   

ओली हळद आणि गाजराचं डिटॉक्स वॉटर, वाटेल दिवसभर फ्रेश-सुधारेल पचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 4:50 PM

Carrot & Turmeric Wellness Detox Water : डिटॉक्स वॉटरसाठी अगदी साध्या दोन गोष्टी वापरा, सोपा सहज उपाय

आपण आपल्या शरीराच्या बाह्य स्वच्छतेची काळजी घेतो, त्याचप्रमाणे शरीराच्या आतील भागाची स्वच्छता करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.  त्यासाठी हे बॉडी डिटॉक्स वॉटर. लोकांना असे वाटते की डिटॉक्स वॉटर केवळ वजन कमी करण्यास मदत करते, परंतु तसे नाही. चयापचय वाढवण्याबरोबरच, हे शरीरातील कोणत्याही प्रकारचे विषारी पदार्थ देखील काढून टाकते, ज्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.वजन कमी करण्यासाठी ठरवलेल्या रूटीनमधून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही नवीन उपाय करू शकता. वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स वॉटर खूप फायदेशीर ठरतं. हे पाणी स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून तयार करण्यात येतं. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या फ्लेव्हर्डचे डिटॉक्स वॉटर पाहिले असतील. गाजर आणि ओल्या हळदीचा वापर करून आपण घरच्या घरी डिटॉक्स वॉटर बनवू शकतो. गाजर आणि ओल्या हळदीचा करून डिटॉक्स वॉटर(Carrot & Turmeric Wellness Detox Water).

साहित्य - 

१. पाणी - ७०० मिली लिटर   २. गाजराचे पातळ काप - २ कप ३. ओल्या हळदीच्या मुळ्या - २ टेबलस्पून ४. आलं - २ इंचाचा तुकडा (बारीक किसलेला) ५. लिंबाचा रस - २ टेबलस्पून ६. लिंबाचे काप - २ तुकडे  ७. दालचिनी पावडर - १/२ टेबलस्पून ८. जिरे पावडर - १/२ टेबलस्पून ९. काळीमिरी पावडर - १/४ टेबलस्पून

a9creativecooking या इंस्टाग्राम पेजवरून गाजर आणि ओल्या हळदीचा वापर करून आपण घरच्या घरी डिटॉक्स वॉटर कसे बनवू शकतो याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

कृती - 

१. एका मोठ्या काचेच्या जारमध्ये सर्वप्रथम पाणी घ्यावे.  २. त्यानंतर या पाण्याने भरलेल्या जारमध्ये गाजराचे पातळ काप, ओल्या हळदीचे तुकडे, बारीक किसलेलं आलं, लिंबाचे काप, लिंबाचा रस, दालचिनी पावडर, जिरे पावडर, काळीमिरी पावडर घालून चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे.  ३. हे तयार झालेले मिश्रण पुढील किमान दोन तास तसेच ठेवावे.  ४. दोन तासांनंतर हे पाणी आपण डिटॉक्स वॉटर म्हणून पिऊ शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य