Join us   

Diabetes Care Tips : डायबिटीस कंट्रोलसाठी गुणकारी ठरतोय हा पदार्थ; ३५% घटते ब्लड शुगर, समोर आला रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 12:56 PM

Diabetes Care Tips : डायबिटीसची समस्या एकदा उद्भवली की संपूर्ण आयुष्य ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात आणि खाताना १० वेळा विचार करण्यातच निघून जातं.

डायबिटीस झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात  इंसुलिन बनणं  बंद होतं. हा हार्मोन साखरेचं उर्जेत रूपांतर करण्याचं काम करतो. पण साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरातील वेगवेगळे अवयव डॅमेज व्हायला सुरूवात होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या आजारावर अशा अनेक गोष्टी गुणकारी ठरू शकतात ज्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येऊ शकते.  (Diabetes Management Tips) 

डायबिटीसची समस्या एकदा उद्भवली की संपूर्ण आयुष्य ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात आणि खाताना १० वेळा विचार करण्यातच निघून जातं. कारण डायबिटीस वाढू नये यासाठी प्रत्येकालाच खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. काही अभ्यासातून असा दावा केला आहे की भोपळ्याच्या बीया (Pimkin seeds) शुगर लेव्हल कमी करण्याासाठी फायदेशीर ठरतात. 

डायबिटीसच्या आजारात ब्लड शुगर मॅनेजमेंट (Blood Sugar management) फार महत्वाचं आहे. यासाठी भोपळा गुणकारी ठरतो. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार भोपळ्याच्या बीयांमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. याला पॉलीसेच्यूराईट्स असंही म्हणलं जातं. शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर ठरत असल्याचं दिसून आलं आहे. प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्येही साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बिया गुणकारी ठरतात. 

 हिवाळ्याच्या दिवसात वाढतो हार्ट अटॅकचा धोका; जीवघेण्या अटॅकपासून बचावाचे उपाय, कारणं जाणून घ्या

हेल्थ बॉडीच्या रिपोर्टनुसार भोपळ्याच्या बियांमध्ये पॉवरफूल एंटीऑक्सिडंट्स असतात. ज्यात प्रोटीन्स आणि फॅट्सही असतात.  २०१८ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार रोजजवळपास ३५ ग्राम या बियांचे सेवन केल्यानं डायबिटीस जवळपास ३५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. डायबिटीसमध्ये आढळणारे मॅग्नेशियम याला जास्त शक्तिशाली बनवते. मॅग्नेशियम डायबिटीचा धोका कमी करण्याचे काम करते. 

या अभ्यासातील संशोधकांना मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी भोपळ्याच्या बियांव्यतिरिक्त आहारात अन्नधान्य, नट्स, ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात  असते जे चांगल्या पचनासाठी आवश्यक असते. याशिवाय भोपळ्याच्या बियांमधील व्हिटामीन ई कॅरोटेनॉयईड्स शरीरातील इन्फेमेशनपासून आराम देतात.  यामुळे डायबिटीससारखे इतर गंभीर आजार दूर राहण्यास मदत होते. याशिवया हायपरटेंशनच्या आजाराचा धोका कमी होतो.   

टॅग्स : मधुमेहआरोग्यहेल्थ टिप्ससंशोधनतज्ज्ञांचा सल्ला