देशभरातील लोक दिवाळीच्या (Diwali 2021) सणाची वाट पाहत असतात, खासकरून फराळावर ताव मारण्यासाठी! सध्याच्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोपेच्या अनियमित वेळा, पौष्टिक घटकांचा अभाव यामुळे डायबिटीससारख्या सायलेंट किलर आजारांचा धोका वाढत आहे. डायबिटीस असलेल्या रुग्णांसाठी जीभेवर ताबा ठेवणं सगळ्यात कठीण असतं. अनेकदा मन मारून कमी खावं लागतं. तर गोड धोड खातानाही १० वेळा विचार करावा लागतो. (How to manage diabetes during diwali)
त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही बिघडते. अशा परिस्थितीत डायबिटीस असलेल्या रुग्णांची स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी खालावू नये, यासाठी या लोकांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया दिवाळीचा सण कसा एन्जॉय करायचा आणि रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित ठेवायची.
....म्हणून सर्वाधिक तरूणांना डायबिटीसचा धोका; रामदेव बाबांनी सांगितले शुगर लेव्हल कमी करण्याचे उपाय
आधीच खाण्यापिण्याचं प्लॅनिंग करा
सणासुदीच्या काळात खाण्यापिण्यापासून पूर्णपणे दूर राहणे मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांना शक्य नाही. अशास्थितीत डायबिटीक रुग्णांनी आपल्या आहाराचे नियोजन आधीच करावे. तसेच, अशा गोष्टी निवडा ज्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असेल. असे अन्न तुमच्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करू शकते आणि तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय उत्सवाचा आनंद घेऊ शकता. परंतु लक्षात ठेवा की अन्नाचे प्रमाण देखील मर्यादित असावे.
शारिरीकदृष्या सक्रीय राहा
डायबिटीस रुग्णांना पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की मधुमेहाच्या रुग्णांना उच्च तीव्रतेचा व्यायाम करण्याची परवानगी नाही, ते फक्त मध्यम तीव्रतेचे व्यायाम करू शकतात. याद्वारे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. याशिवाय व्यायामासोबतच योग्य आहाराची काळजी घ्या. एव्हढं केल्यास तुम्हाला दिवाळीचा पुरेपूर आनंद लूटता येईल.
सकाळी सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? एलर्जी सर्दीवर हे घ्या हमखास उपाय
पाणी पित राहा
या सणांच्या तयारी दरम्यान, लक्षात ठेवा की स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही पाण्याचे प्रमाण समान ठेवता तेव्हा तुम्ही अनावश्यक स्नॅक्स खाणे टाळता आणि तुमचे पोटही भरलेले राहते. लक्षात ठेवा की यावेळी, किमान 1 ते 2 लिटर पाणी प्या. याशिवाय चहा, कॉफी, सोडा इत्यादी पेयांपासून अंतर ठेवा. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथी दाणे पाण्यात भिजवून हे पाणी प्यावे. याचा तुम्हाला फायदा होईल.
जेवणाच्या वेळा पाळा
सणांच्या दिवशी किंवा पार्टिला हवं ते खाण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी डायबिटीक रुग्ण अनेकदा जेवण टाळतात. त्यांना वाटतं जेवण टाळल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. पण ते तसे नाही. असं केल्यानं तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. अशा परिस्थितीत जेवणामध्ये किमान अंतर ठेवा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. याशिवाय प्रथिने, चांगले कार्ब्स इत्यादी पदार्थ आहारात खावेत. असे घटक तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवून चढ-उतार होण्यापासून रोखतील.
याशिवाय मैद्यापासून बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहा. यासाठी तुम्हाला हवे असल्यास गोड पदार्थही घरी बनवू शकता. तसेच बाजारातून काही उत्पादने खरेदी करताना त्यामागील लेबलवर दिलेले घटक वाचा आणि सर्व काही पाहिल्यानंतर खरेदी करा.
'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कमी वयातच उद्भवतात हृदयाचे जीवघेणे आजार; समोर आलं कारण
सगळ्यात महत्वाचे
तयारी करण्यात किंवा सणांचा आनंद लुटण्यात इतके मग्न होऊ नका की तुम्ही तुमची औषधे घेणे विसरलात. लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत औषधे घेत रहा. त्याच वेळी, जर तुम्हाला डॉक्टरांकडून नियमित तपासणी करायची असेल, तर ती पुढे ढकलू नका. लक्षात ठेवा की औषधं न घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते किंवा चढउतार होऊ शकते आणि तुमची स्थिती बिघडू शकते.