सध्याच्या काळात डायबिटीसचा आजार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच उद्भवतो. तुम्ही 'पनीरच्या फूलाबद्दल ऐकलंय? याला पनीर दोडा असेही म्हणतात. जे दुधापासून बनवले जाते. ही पनीर फुले मधुमेहासाठी सर्वात प्रभावी आयुर्वेदिक उपचार आहेत. डायबिटीस आज एक असा रोग बनला आहे, ज्यामुळे जगातील बहुतेक लोक त्रस्त आहेत. डायबिटीसग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्याला अनेक समस्या येऊ लागतात. पण पनीरच्या फुलाच्या वापराने रक्तात विरघळलेले ग्लुकोज (रक्तातील साखर) सहज नियंत्रित करता येते.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याव्यतिरिक्त, पनीरचं फुल इतर अनेक रोगांमध्ये देखील फायदेशीर आहे. हे फूल निद्रानाश, दमा आणि लघवीचे प्रमाण वाढवणारी समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पनीर फुलाचे फायदे आणि डायबिटीस नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा योग्य मार्ग जाणून घेऊया.
पनीरचं फूल डायबिटीस कसं नियंत्रणात ठेवते?
टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी पनीरचं फूल एक प्रभावी उपचार आहे. खरं तर, पनीरच्या फुलाचे सेवन केल्याने शरीर इन्सुलिनचा अधिक चांगला वापर करण्यास सक्षम होत. ज्यामुळे रक्तातील साखर विरघळण्याची प्रक्रिया मंदावते. याशिवाय पनीरची फुले तुमचे स्वादुपिंड निरोगी ठेवतात. स्वादुपिंड हा हार्मोन इन्सुलिन तयार करणारा अवयव आहे. या फुलाच्या दैनंदिन वापराने मधुमेही रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते आणि निरोगी जीवन जगता येते.
साधारणपणे, पनीरचे फूल आयुर्वेदिक औषध आणि हर्बल दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. याशिवाय, ही फुले आजकाल ऑनलाइन स्टोअरवरही उपलब्ध आहेत आणि तिथूनही ऑर्डर करता येतात. तुम्ही ते पनीरचे फूल किंवा पनीर दोडी या नावाने खरेदी करू शकता. ही छोटी फुले आहेत, ज्यांची चव खूप गोड आहे.
पनीरचं फूलं सेवन करण्यास सोपी आहेत. यासाठी पनीरची 7-8 फुले रात्रभर पाण्यात भरलेल्या काचेच्या ग्लासमध्ये भिजवून ठेवा. काचेचे ग्लास किंवा इतर कोणतीही भांडी वापरा. ही फुले रात्रभर पाण्यात भिजू द्या. सकाळी उठल्यानंतर पनीरची फुलं चाळणीच्या मदतीने गाळून घ्या आणि त्याचे रिकाम्या पोटानं सेवन करा. हे देखील लक्षात ठेवा की पनीर दोड्याचे पाणी पिल्यानंतर तुम्हाला 1 तास काहीही खायचं किंवा प्यायचं नाहीये. तुम्ही फक्त 1 तासानंतर नाश्ता करा.
डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी अन्य टिप्स
डायबिटीसवर औषधांनी काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. परंतु हा आजार पूर्णपणे बरा होत नाही.
लठ्ठपणा नियंत्रणात ठेवल्यानं डायबिटीससारखे आजार लांब राहण्यास मदत होत.
ब्लड शुगर वाढण्यापासून रोखण्यासाठी गोड अन्नपदार्थांपासून लांब राहा.
रोज कमीत कमी ३० मिनिटं पायी चालायला हवं. हलके फुलके व्यायाम करायला हवेत. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
घरगुती उपायांनी साखर नियंत्रणात राहण्यास वेळ लागतो त्यामुळे लक्षणं जास्त दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.