डायबिटीस (Diabetes) हा एक गंभीर आणि असाध्य आजार आहे. जर एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला तर त्याला आयुष्यभर आजारासोबत राहावे लागते. मधुमेहासह निरोगी जीवन जगण्याचा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे. रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा मार्ग कोणता आहे? याचं उत्तर म्हणजे रक्तातील साखर वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन कमी करणे आणि त्याशिवाय नियमित व्यायाम करणे. (According to indian famous nutritionist diabetic patients follow these 5 tips to control blood sugar)
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह हा एक जीवनशैलीचा आजार आहे ज्यामध्ये रुग्णाचा स्वादुपिंड रक्तातील साखर नियंत्रित करणारा हार्मोन इंसुलिनचे उत्पादन कमी करतो किंवा थांबवतो. यामुळे, रुग्णाच्या रक्तातील साखर वाढू लागते, ज्यामुळे अनेक हानिकारक समस्या उद्भवू शकतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत, मात्र खाण्याच्या सवयी सुधारूनही ही समस्या आटोक्यात ठेवता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतातील प्रसिद्ध पोषणतज्ञ अंजली मुखर्जी तुम्हाला मधुमेह नियंत्रित करण्याचे काही सोपे उपाय सांगत आहेत.
अक्षय्य तृतीयेला खरेदी करा डेली वेअर, कमी ग्रॅमचं मंगळसुत्र; या घ्या एकापेक्षा एक लेटेस्ट डिजाईन्स
फायबर्सचे प्रमाण वाढवा
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवावे. यासाठी सर्व प्रकारच्या कडधान्ये, काजू, बिया, फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात.
ठराविक वेळेनंतर आहार घ्या
वजन कमी करायचे असो, मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असो. तज्ज्ञ दिवसातून अनेक वेळा स्मॉल मील खाण्याचा सल्ला देतात. यासाठी दिवसातून तीन वेळा जड जेवण घेण्याऐवजी 4-5 वेळा थोडे थोडे अन्न खावे.
काय खायचं नाही?
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचा योग्य मार्ग म्हणजे पांढरा भात. मिठाई, शीतपेये, साखरयुक्त आणि चरबीयुक्त पदार्थ यांसारखे शुद्ध पदार्थ टाळणे.
कमी साखरयुक्त पदार्थ खा
सर्व प्रकारची फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य नाहीत. काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. स्ट्रॉबेरी, पेरू इत्यादी कमी साखरेची फळे खावीत. अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती देखील मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. जांभळापासून बनवलेले जांबुकासव हे सरबत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते.