Join us   

Diabetes control food : वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील ६ पदार्थ; इन्शुलिन इंजेक्शनची गरजही होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 11:31 AM

Diabetes control food : आळशीच्या बीयांमध्ये भरपूर फायबर आणि आरोग्यदायी स्निग्ध असतात आणि त्यात अनेक गुणधर्म असतात. विशेषतः फ्लेक्स बिया रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.

डायबिटीस (Diabetes) हा  एक गंभीर आजार आहे, जो खूप वेगाने वाढत आहे. दुर्दैवाने, डायबिटीसवर कायमस्वरूपी इलाज नाही. त्यावर फक्त नियंत्रण ठेवता येते. वास्तविक, हा एक असा गुंतागुंतीचा आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरात एकतर पुरेसे  इन्शुलिन तयार होत नाही किंवा ते तयार केलेले  इन्शुलिन प्रभावीपणे वापरू शकत नाही. असे मानले जाते की मधुमेही रुग्णांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. (How to control sugar level) 

डायबिटीसमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. हे प्रमाण नियंत्रणात न राहिल्यास रक्तातील साखर सतत वाढत राहते, ज्यामुळे रुग्णाच्या नसा, डोळे, किडनी आणि इतर अवयवांना इजा होऊ शकते. मधुमेहाच्या लक्षणांमध्ये भूक न लागणे, तहान वाढणे, वजन कमी होणे, वारंवार लघवी होणे, अस्पष्ट दृष्टी, अत्यंत थकवा आणि जखमा बऱ्या न होणे यांचा समावेश होतो. (What are the best foods for people with diabetes, and what should be avoided?)

काही  डायबिटीक रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी   इन्शुलिन थेरपीची देखील आवश्यकता असते. त्यासाठी   इन्शुलिनची इंजेक्शन्स येतात. तुमच्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यात आणि मधुमेहाची गुंतागुंत टाळण्यासाठी   इन्शुलिन महत्त्वाची भूमिका बजावते. (Tips for healthy eating with diabetes)

  इन्शुलिन शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करते आणि उर्जेसाठी अतिरिक्त ग्लुकोज साठवते. डायबिटीसच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्याद्वारे हे सहजपणे नियंत्रित केले जाऊ शकते आणि आपल्याला   इन्शुलिन इंजेक्शनची देखील आवश्यकता नाही.

ब्रोकोली स्प्राऊट्स

डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही ब्रोकोली स्प्राउट्स खाऊ शकता. एका अभ्यासानुसार, ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचे पदार्थ असतात, जे   इन्शुलिन संवेदनशीलता, रक्तातील साखर आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ब्रोकोली स्प्राउट्समध्ये ग्लुकोराफेनिन सारखे घटक असतात, जे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये   इन्शुलिन संवेदनशीलता आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.

भोपळ्याच्या बीया

फायबर आणि अँटिऑक्सिडंटने भरपूर भोपळ्याच्या बिया रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. भोपळ्यामध्ये पॉलिसेकेराइड्स नावाचे कार्बोहायड्रेट जास्त असते, जे रक्तातील साखर नियंत्रित करते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, भोपळ्याच्या बिया भाजून खाल्ल्याने साखरेच्या रुग्णांना फायदा होतो. तुम्ही भोपळ्याचा रस किंवा त्याची पावडर देखील वापरू शकता.

नट्स

संशोधनात असे दिसून आले आहे की रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी नट खाणे हा एक प्रभावी मार्ग आहे. टाइप 2 मधुमेह असलेल्या 25 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की शेंगदाणे आणि बदाम दोन्ही खाल्ल्याने जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, दुसऱ्या अभ्यासात असे आढळून आले की दररोज 56 ग्रॅम नट खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते.

आळशीच्या बीया

आळशीच्या बीयांमध्ये भरपूर फायबर आणि आरोग्यदायी स्निग्ध असतात आणि त्यात अनेक गुणधर्म असतात. विशेषतः फ्लेक्स बिया रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की जे रुग्ण आळशीच्या बीया खातात त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात लक्षणीय सुधारणा होते.

चीया सीड्स

चिया सीड्स खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. अभ्यासात असे आढळून आले आहे की चिया सीड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि   इन्शुलिनची संवेदनशीलता सुधारते. एवढेच नाही तर डायबिटीसचा धोकाही कमी करू शकतो.

केल 

त्याला सुपरफूड म्हणतात. त्यात फायबर आणि फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट असतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. एका अभ्यासानुसार, उच्च-कार्बयुक्त जेवणासह 7 किंवा 14 ग्रॅम केल खाल्ल्याने जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. संशोधनात असे दिसून आले आहे की केलच्या पानांमध्ये मध्ये आढळणारे क्वेर्सेटिन आणि केम्पफेरॉल सारख्या फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट्समध्ये   इन्शुलिन सुधारण्याची क्षमता असते.

टॅग्स : मधुमेहआरोग्यहेल्थ टिप्स