Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Diabetes Control Tips :  ....म्हणून सर्वाधिक तरूणांना डायबिटीसचा धोका; रामदेव बाबांनी सांगितले शुगर लेव्हल कमी करण्याचे उपाय 

Diabetes Control Tips :  ....म्हणून सर्वाधिक तरूणांना डायबिटीसचा धोका; रामदेव बाबांनी सांगितले शुगर लेव्हल कमी करण्याचे उपाय 

Diabetes Control Tips : बाबा रामदेव यांच्या मते, जर तुमच्या रक्तातील साखर काही प्रमाणात वाढली असेल तर ती योगासने आणि काही घरगुती उपायांनी कमी करता येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 01:50 PM2021-10-27T13:50:00+5:302021-10-27T14:02:58+5:30

Diabetes Control Tips : बाबा रामदेव यांच्या मते, जर तुमच्या रक्तातील साखर काही प्रमाणात वाढली असेल तर ती योगासने आणि काही घरगुती उपायांनी कमी करता येते.

Diabetes Control Tips : Blood sugar control tips baba ramdev told the reason behind diabetes some home remedies to control it | Diabetes Control Tips :  ....म्हणून सर्वाधिक तरूणांना डायबिटीसचा धोका; रामदेव बाबांनी सांगितले शुगर लेव्हल कमी करण्याचे उपाय 

Diabetes Control Tips :  ....म्हणून सर्वाधिक तरूणांना डायबिटीसचा धोका; रामदेव बाबांनी सांगितले शुगर लेव्हल कमी करण्याचे उपाय 

रक्तातील साखरेचे प्रमाण बहुतेक लोकांसाठी त्रासाचे कारण बनले आहे आणि कालांतराने ही समस्या वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेला बदल, त्यात सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेद आणि योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) स्पष्ट करतात की, वाढलेला ताण, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादींमुळे स्वादुपिंड कमकुवत होतो. यामुळे बीटा सेल वाढतो आणि आपल्याला डायबिटीजचा त्रास होतो. ते म्हणतात की आजकाल डायबिटीसची समस्या वेगाने वाढत आहे. वेळेवर न जेवणं, व्यायाम न करणं या आजारासाठी कारणीभूत ठरत आहे.  (How to control Sugar level)

बाबा रामदेव यांच्या मते, जर तुमच्या रक्तातील साखर काही प्रमाणात वाढली असेल तर ती योगासने आणि काही घरगुती उपायांनी कमी करता येते. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त असेल आणि तुम्ही इन्सुलिन हे औषध घेत असाल तर ते अचानक बंद करू नका, तर रक्तातील साखर नियंत्रणात येऊ द्या, असा सल्ला ते देतात. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण काही प्रमाणात नियंत्रित होते, तेव्हा काही घरगुती उपाय आणि योगासने सुरू करा जेणेकरून रक्तातील साखर दीर्घकाळ नियंत्रणात राहते.

शेवगाच्या शेंगा

शेवगाच्या शेंगांची पाने रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत कारण त्यात एस्कॉर्बिक ऍसिड असते, जे इन्सुलिन वाढू देत नाही. ते वापरण्यासाठी, पाने बारीक करून, रस पिळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते. हे एक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आहे, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी वापरू शकता. ते प्यायलाही चविष्ट आहे.

केस फार पांढरे झालेत? मग डोक्यावरचा एकही केस पांढरा उरणार नाही, फक्त शॅम्पूत मिसळा ही गोष्ट

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते. हे एक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आहे, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी वापरू शकता. ते प्यायलाही चविष्ट आहे.

दालचिनी 

भारतीय जेवणात दालचिनीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दालचिनीच्या वापरामुळे इन्सुलिन वाढते. याव्यतिरिक्त, ते रक्तातील साखरेची पातळी देखील कमी करते. विशेष म्हणजे याचे रोज सेवन केल्याने लठ्ठपणाही कमी होऊ शकतो. ते वापरण्यासाठी दालचिनी बारीक वाटून घ्या आणि रोज कोमट पाण्यासोबत घ्या. प्रमाण विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त पावडरमुळे नुकसान होऊ शकते.

 जरा खाण्यात बदल झाला की पोट साफ होत नाही? डॉक्टरांनी सुचवलेले हे उपाय करा अन् पोटभर खा

जांभळाच्या बीया

आयुर्वेदात वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचे वेगवेगळे फायदे आहेत. त्याचप्रमाणे जांभळाच्या बिया मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हे वापरण्यास देखील खूप सोपे आहे. प्रथम बिया चांगल्या प्रकारे कोरड्या करा. त्यानंतर ते बारीक करून पावडर बनवा. पावडर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्या.

तुळशीची पानं

तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यात अनेक पदार्थ असतात जे स्वादुपिंडाच्या बीटा पेशींचे इन्सुलिनमध्ये सक्रियकरण कमी करतात. त्यामुळे जास्त इन्सुलिन तयार होते. रक्तातील साखर कमी करण्यासाठी दोन ते तीन तुळशीची पाने सकाळी रिकाम्या पोटी चावून खावीत. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुळशीचा रसही पिऊ शकता.
 

Web Title: Diabetes Control Tips : Blood sugar control tips baba ramdev told the reason behind diabetes some home remedies to control it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.