डायबिटीसच्या रुग्णांसाठी ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं खूप कठीण असतं. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत औषधं घेणं, व्यायाम करणं आणि खाण्यापिण्याच्या सवयी नियमित ठेवणं महत्वाचं असतं. डायबिटीक रुग्णांना नेहमी आपली जीवनशैली संतुलित ठेवावी लागते. (Steps to Manage Your Diabetes for Life) अनेकदा डायबिटीक रुग्णांना सतत भूक, तहान लागत असल्यानं व्यवस्थित झोप पूर्ण करता येत नाही. याच कारणामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याचा धोका असतो. म्हणून या लेखात तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत करता येऊ शकते. (How to control sugar level)
झोपण्याआधी ब्लड शुगर लेव्हल तपासा
डायबिटीक रुग्णांनी आपल्या शरीरातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. झोपण्याआधी नियमितपणे शुगर लेव्हल तपासण्याची सवय ठेवा. यामुळे औषधांनी तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहतेय की नाही ते समजण्यास डॉक्टरांना मदत होईल. रात्री झोपताना तुमच्या शरीरातील साखरेची पातळी ९० ते १५० मिलिग्राम प्रति डेसीलीटर यादरम्यान असायला हवी. (Managing Blood Sugars When You Have Diabetes)
झोपण्याआधी काय खायचं?
साधारपणे डायबिटीसच्या रुग्णांचा रक्तातील साखरेचे प्रमाणत २ ते ८ वाजताच्या सुमारास वाढलेले असते. यामागे कोणतंही खास कारण नसते. हार्मोनल बदल इंसुलिनचं प्रमाण कमी होणं, झोपण्याआधी औषधं किंवा कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ खाणं अशी कारणं असू शकतात. त्यासाठी झोपण्यआधी फायबर्स आणि कमी फॅट्सयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवं. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कॅफेनपासून लांब राहा
झोपण्याच्या काही तास आधी कॉफी, चॉकलेट आणि सोडायुक्त पदार्थांचे सेवन करणं टाळा. कॅफेनयुक्त पदार्थांमुळे डोकं अधिक उत्तेजित होतं. परिणामी चांगली झोप येत नाही. याव्यतिरिक्त दारूचे कमी प्रमाणात सेवन करा. यामुळे तुमचा स्लिपिंग पॅटर्न खराब होतो. कारण तुम्ही रक्तातील सारख वाढवत असलेल्या पदार्थांचे सेवन करत असता.
बॅड कोलेस्टेरॉल ३० दिवसात कमी करतात ५ प्रकारचे ज्यूस
वॉकिंग
व्यायाम इंसुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. म्हणूनच जेवल्यानंतर आणि झोपण्याआधी चालायला जाण्याची सवय ठेवा. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. नॅशनल स्लिप फाऊंडेशननुसार चांगल्या झोपेसाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला व्यायाम करणं शक्य नसेल तर तुम्ही फिरायला नक्कीच जाऊ शकता.
झोपण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या
झोपण्याआधी खोली व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुम्हाला लगेच झोप येईल. खोलीत हलका प्रकाश असेल असा बल्ब लावा, पडदा व्यवस्थित लावा, मोबाईल बाजूला ठेवून द्या. शरीरा एकदम रिलॅक्स ठेवा. जर लवकर झोप येत नसेल तर कोणतंही पुस्तक वाचत बसा. रात्री झोपताना दिवसभरातील घटनांचा जास्त विचार करू नका.