डायबिटीसची समस्या खूप वाढत आहे. जेव्हा रक्तात ग्लुकोज लेव्हल जास्त होते तेव्हा स्वादुपिंडातून हार्मोन्स रिलिज केले जातात. इंसुलिन ग्लुकोज मेंटेन ठेवते. स्वादुपिंडातून हे हार्मोन्स रिलिज होत नाहीत तेव्हा डायबिटीसचा धोका उद्भवतो. (How to reverse diabetes) टाईप १ डायबिटिसमध्ये स्वादुपिंडाद्वारे इंसुलिनचे उत्पादन करणं पूर्णपणे बंद करते तर टाईप २ डायबिटीसध्ये इंसुलिनचे उत्पादन कमी प्रमाणात होते. या आजाराच्या सुरूवातीच्या स्टेजला प्री डायबिटीक स्टेज असंही म्हटलं जातं. डायबिटीसवर सुरू असलेल्या अभ्यासानुसार जर तुम्ही प्री डायबिटीक स्थितीत असाल तर भात आणि चपाती न खाता प्रोटिन इन्टेक वाढवायला हवा. (How to reverse diabetes cut carbs to 55 per cent increase protein to 20 percent to control blood sugar)
इंडियन काऊंलिस ऑफ मेडिकल रिसर्च इंडिया डायबिटीसच्या नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात १८ हजार ९० व्यक्तींच्या खाण्यापिण्यातील पोषक तत्वांवर विश्लेषण करण्यात आले होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डायबिटीसपासून सुटका मिळवण्यासाठी कार्ब्स ४९ ते ५४ टक्के, प्रोटिन्स १९ ते २० आणि फॅट २१ ते २६ टक्के आणि डाएटरी फायबर्स ५ ते ६ टक्के असायला हवेत. महिलांनी पुरूषांच्या तुलनेत २ टक्के कमी कार्ब्स आहारात घ्यायला हवेत. तरूणांच्या तुलनेत वयस्कर लोकांनी कार्ब्सचे सेवन १ टक्के कमी करायला हवं.
प्री डायबिटीसच्या स्थितीपासून सुटका मिळवण्यासाठी कार्ब्सचे सेवन ५० ते ५६ टक्के आणि प्रोटिन्स १० ते २० टक्के, फॅट २१ ते २७ टक्के आणि डाएटरी फायबर्स ३ ते ५ टक्के असावेत. जे लोक फिजिकली एक्टिव्ह नसतात त्यांनी कार्ब्सचे सेवन ४ टक्के कमीकरायला हवे.
जेवणात काय असायला हवं
डॉ. मोहन सांगतात की, जेवणाच्या ताटात हिरव्या भाज्या, बीन्स, पत्ताकोबी, फुलकोबी, स्टार्चयुक्त पदार्थ समाविष्ट करा. तर उरलेल्या भागात मासे, चिकन आणि सोया यांचा समावेश करू शखता. थोडासा भात आणि चपातीसुद्धा तुम्ही खाऊ शकता.
डायबिटीस कंट्रोल टिप्स
फॅट टू स्लिम आणि न्यूट्रिशनिस्ट आणि आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारे कांदे वापरू शकता. कांदा ही अशी भाजी आहे की ती तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. भाज्यांव्यतिरिक्त, आपण सूप, स्ट्यू, सॅलड किंवा सँडविचमध्ये कांदे वापरू शकता. डायबिटीसचे रुग्णही कांद्याचे पाणी वापरू शकतात. हे एक प्रकारचे लो-कॅलरी डिटॉक्स पेय आहे जे तुम्ही दररोज सकाळी घेऊ शकता.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा स्वस्त घरगुती उपाय आहे जो सहज तयार करता येतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कांद्याचे पाणी बनवण्यासाठी २ चिरलेले कांदे, १ कप पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ चिमूट कांदा मीठ घ्या. ब्लेंडर घ्या आणि सर्व साहित्य एकत्र करा. तुम्हाला ते फिल्टर करण्याची गरज नाही कारण त्यातील फायबर देखील तुमच्यासाठी फायदेशीर आहे.