Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Diabetes Diet Plan : डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये राहील, रोजच्या जेवणात ६ पदार्थ खा; शुगर वाढण्याचं टेंशन नसेल

Diabetes Diet Plan : डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये राहील, रोजच्या जेवणात ६ पदार्थ खा; शुगर वाढण्याचं टेंशन नसेल

Diabetes Diet Plan : मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या जेवणाच्या ताटात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. जेव्हा भूक लागते तेव्हा फळे हा एक चांगला पर्याय आहे आणि फळे अन्नासोबत घेणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:39 AM2022-09-14T11:39:53+5:302022-09-14T11:52:04+5:30

Diabetes Diet Plan : मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या जेवणाच्या ताटात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. जेव्हा भूक लागते तेव्हा फळे हा एक चांगला पर्याय आहे आणि फळे अन्नासोबत घेणे आवश्यक आहे.

Diabetes Diet Plan : Consultant endocrinologist suggest best foods to eat and avoid with diabetes to control blood sugar level | Diabetes Diet Plan : डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये राहील, रोजच्या जेवणात ६ पदार्थ खा; शुगर वाढण्याचं टेंशन नसेल

Diabetes Diet Plan : डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये राहील, रोजच्या जेवणात ६ पदार्थ खा; शुगर वाढण्याचं टेंशन नसेल

विविध वयोगटातील लोकांमध्ये मधुमेह ही एक मोठी समस्या बनत आहे. हा जीवनशैलीचा आजार आहे, जो निष्काळजीपणामुळे बळावतो. हा एक जुनाट आणि चयापचय रोग आहे ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोज (Blood Sugar) पातळी वाढते, ज्यामुळे हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि नसा यांचे नुकसान होते. भारतातील 20 ते 70 वयोगटातील सुमारे 8.7 टक्के प्रौढांना मधुमेहाचा त्रास आहे. (Diabetes Diet Plan) बैठे राहणीमान, खराब आहार, धूम्रपान आणि मद्यपान ही मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य आजारांच्या झपाट्याने वाढीची प्रमुख कारणे आहेत. (Consultant endocrinologist suggest best foods to eat and avoid with diabetes to control blood sugar level) डॉ. विक्रांत गोसावी, मणिपाल हॉस्पिटल्स, बाणेर- पुणे येथील एंडोक्रिनोलॉजीचे सल्लागार यांनी लठ्ठपणासह मधुमेहाशी निगडित मुख्य जोखमींविषयी एनबीटीशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. डायबिटीस टाळण्यासाठी रुग्णाने आपल्या जीवनशैलीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

जेवणाच्या ताटात  या पदार्थांचा समावेश असायलाच हवा

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या जेवणाच्या ताटात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. जेव्हा भूक लागते तेव्हा फळे हा एक चांगला पर्याय आहे आणि फळे अन्नासोबत घेणे आवश्यक आहे. फळे आणि भाज्यांमधून शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतात, जे शरीराचे आरोग्य राखण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मधुमेहींनी फळे खाऊ नयेत,  हा गैरसमज आहे कारण फळांमध्ये साखर असते. फळांमध्येही साखर असते, पण ती नैसर्गिक साखर असते.

प्रोसेस्ड फूड किंवा मांसाहार करू नका

अगदी कमी प्रमाणात लाल मांस देखील मधुमेहाचा धोका वाढवू शकतो. दररोज 50 ग्रॅम मांस किंवा मासे खाल्ल्यास मधुमेह होण्याची शक्यता 11 टक्क्यांनी वाढते. तसेच, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ब्रेड, तळलेले आणि जास्त सोडियम असलेले मांस, हॉट डॉग आणि इतर प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळावे. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मैदा अत्यंत हानिकारक आहे. मैदा हे बारीक पीठ आहे, ज्यामध्ये खूप कमी पौष्टिकता आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे, ज्यामुळे ते साखरेसारखे बनते. मैद्यात गोडवा नसतो, पण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण साखरेइतके वाढते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी भूक लागल्यावर लो-कार्ब भाज्या  खाव्यात.

गोड पदार्थ टाळा

जर एखाद्याला मधुमेह असेल तर कमी कार्बोहायड्रेट आणि साखर नसलेली मिठाई शोधणे खूप कठीण आहे. मधुमेहाच्या रुग्णांना अशा मिठाई शोधणे खूप कठीण आहे, ज्यात पोषण देखील आहे. पण डायबिटीजग्रस्त लोक डार्क चॉकलेट खाऊ शकतात कारण त्यात साखर, कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज मिल्क चॉकलेटपेक्षा कमी असतात. 

बनाना आइस्क्रीम हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि साखर कमी असते. नट्सचे सेवन देखील केले जाऊ शकते कारण ते रिकाम्या पोटी इन्सुलिनची पातळी कमी करतात आणि इन्सुलिनचा प्रतिकार कमी करतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते.

वेळेवर जेवा

मधुमेहाच्या रुग्णासाठी खाण्याची वेळ खूप महत्त्वाची असते कारण शरीरातील साखरेचे शोषण हे तुम्ही काय आणि केव्हा खाता यावर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीने दररोज एकाच वेळी समान प्रमाणात अन्न खाल्ले तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. जर नियमित अंतराने अन्न दिले गेले तर व्यक्ती निरोगी खाण्याच्या दिशेने जाईल. ही सवय त्याला स्नॅक किंवा जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करेल.

डाएट प्लॅन ठरवा

मधुमेहींनी रात्री हलका आहार घ्यावा. रात्री उशिरा अतिरिक्त कॅलरीज खाल्ल्याने वजन वाढते. जर एखाद्या व्यक्तीने असा आहार घेतला, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल.

Web Title: Diabetes Diet Plan : Consultant endocrinologist suggest best foods to eat and avoid with diabetes to control blood sugar level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.