Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटीसमुळे वाढतात डोळ्यांच्या समस्या, वेळीच काळजी घ्या, नाहीतर..तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

डायबिटीसमुळे वाढतात डोळ्यांच्या समस्या, वेळीच काळजी घ्या, नाहीतर..तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Diabetes Eye Problems Retinopathy : डोळ्यांवर या मधुमेहाचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2023 11:26 AM2023-02-05T11:26:40+5:302023-02-05T11:41:01+5:30

Diabetes Eye Problems Retinopathy : डोळ्यांवर या मधुमेहाचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात याविषयी...

Diabetes Eye Problems Retinopathy : Eye problems increase due to diabetes, take care on time, otherwise...valuable advice from experts | डायबिटीसमुळे वाढतात डोळ्यांच्या समस्या, वेळीच काळजी घ्या, नाहीतर..तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

डायबिटीसमुळे वाढतात डोळ्यांच्या समस्या, वेळीच काळजी घ्या, नाहीतर..तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

डॉ. देविका दामले

मधुमेह ही आजच्या काळात सर्वांच्या परीचयाची असलेली समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचं प्रमाण इतके वाढले आहे की भारत देश आज जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो. मधुमेह म्हणजे असा एक विकार आहे जो आपल्या शरिरातील पॅनक्रियाज नावाच्या ग्रंथीच्या अकार्यक्षमतेमुळे होतो. पॅनक्रियाज इन्सुलिन नावाचं एक हॉर्मोन तयार करतात जे आपली रक्तशर्करा प्रमाणात ठेवण्याचं काम करतं. जेव्हा हे इन्सुलिन पॅनक्रियाजमध्ये तयार होत नाही किंवा त्या इन्सुलिनचा आपल्या शरिरातील साखरेच्या पातळीवर परिणाम होण्याच्या कार्यात अडथळे येतात तेव्हा आपण मधुमेह झाला असे म्हणतो. इन्सुलिनच्या अभावामुळे किंवा अकार्यक्षमतेमुळे रक्तशर्करा वाढत जाते तेव्हा शरिरातील सर्व अवयवांवर त्याचा परिणाम होतो (Diabetes Eye Problems Retinopathy).

ज्याप्रमाणे साखर सांडली की त्याला मुंग्या लागतात, त्याचप्रमाणे जेव्हा शरीरात साखर वाढत जाते तेव्हा पूर्ण अवयंवाना इजा पोहोचवते. यामुळे मधुमेहासोबतच इतर शारिरिक व्याधीही जडतात. आपल्या डोळ्यांवर या मधुमेहाचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊया. मधुमेह आपल्या डोळ्यांच्या प्रत्येक भागावर दुष्परिणाम करतो.

(Image : Google)
(Image : Google)

आपल्या शरिराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने डोळ्यांच्या पापण्यांचे इन्फेक्शन ( ब्लेफरायटिस- Blepharitis) सतत रांजणवाडी येणे, अश्रुपिशवीचे इन्फेक्शन (डॅक्रिओसिस्टायटिस- Dacryocystitis- Lacsimal sac infection) डोळ्यांच्या आतल्या भागात सूज येणे (Uveitis, orbital cellulitis) अशा विविध समस्या उद्भवू शकतात. याशिवाय डोळ्यांना कोरडेपणा येणे, डोळ्यांच्या स्नायूंना पुरवठा करणाऱ्या मज्जातंतूचे विकार या व्याधीही उद्भवतात. काही विकारांमध्ये नजर कमी होते, ते म्हणजे

१. मोतिबिंदू (Diabetic cataract- डायबेटिक कॅटरॅक्ट) 

२. काचबिंदू (Glaucoma- ग्लॉकोमा) 

३. नेत्रपटल व्याधी (Diabetic retinopathy- डायबेटिक रेटिनोपथी)

डायबेटिक रेटिनोपथीबाबत आपल्याला बऱ्याच शंका असतात, त्याबद्दल...

रेटिना म्हणजे काय? 

आपला डोळा कॅमेराप्रमाणे काम करतो असे आपण म्हणतो, यामध्ये असणारी रेटिना अथवा नेत्रपटल म्हणजे कॅमेरातील फिल्मचे काम करतो. आपल्या डोळ्यांवर पडणारे प्रकाशकिरण नेत्रपटलावर पडतात व ते किरण आपल्या मेंदूला डोळ्यांच्या नसेमार्फत पोहोचवले जातात ज्यामुळे आपल्याला दिसू शकते. आपल्या डोळ्यांच्या आतील भागात या रेटिनाचे अतिशय पातळ असे आवरण असते ज्यामुळे आपण पाहू शकतो. या पडद्यातील मध्यभाग हा आपल्या दृष्टीसाठी सर्वात जास्त संवेदनशील भाग असतो ज्याला 'मॅक्युला' असं म्हणतात.

(Image : Google)
(Image : Google)

डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय?

आपल्याला दिसण्यासाठी रेटीनाचे काम किती महत्त्वाचे असते हे आपल्याला समजले. आता याच रेटिनांच्या संरचनेत किंवा रक्तवाहिन्यांमधे मधुमेहामुळे जे दुष्परिणाम होतात त्या व्याधींना एकत्रितपणे डायबेटिक रेटिनोपथी म्हटले जाते. यावर वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक असते अन्यथा भविष्यात या समस्या गंभीर रुप धारण करु शकतात. 

(लेखिका पुण्यातील नेत्रतज्ज्ञ आहेत)

devikadamle@gmail.com

Web Title: Diabetes Eye Problems Retinopathy : Eye problems increase due to diabetes, take care on time, otherwise...valuable advice from experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.