आजकाल चुकीची लाईफस्टाईलमुळे लहान वयातील लोकांनाही गंभीर आजार होत आहेत. यातील एक म्हणजे डायबिटीस आहे. (Diabetes) डायबिटीस हा एक असा आजार आहे जो लवकर संपू शकत नाही. (Diabetes Control Tips) डायबिटीस झाल्यानंतर पॅन्क्रियाजमध्ये योग्य प्रमाणात इंसुलिन तयार होत नाही. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढू लागते. वेळेवर या आजारावर नियंत्रण मिळवले तर नाही अनेक महत्वाच्या अवयवांचे नुकसान होते. (Diabetes Patients Eat This One Thing Mixed With Turmeric To Control Blood Sugar)
याव्यतिरिक्त काही घरगुती उपाय करून तुम्ही ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करू शकता. काही घरगुती उपाय ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होण्यास फायदेशीर ठरतात. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फोर्मेशनच्या रिपोर्टनुसार (Ref)हळदीतील सक्रिय घटक कर्क्युमिन डायबिटीसशी लढण्यास प्रभावी ठरते. रोज चिमुटभर हळदीचा समावेश आहारात केल्यास शुगर लेव्हल नियंत्रणात राहू शकते फक्त आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं.
ब्लड शुगर कंट्रोलसाठी हळद, आवळा फायदेशीर
कर्क्युमिनच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी सर्वात जास्त वापरला गेलेला प्राणी म्हणजे उंदीर, ग्लासेमियावरील कर्क्युमिनच्या प्रभावाची तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या डायबिटीस असलेल्या उंदरांच्या मॉडल्सचा वापर करण्यात आला होता. डायबिटीस कंट्रोलसाठी तुम्ही औषधांऐवजी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यात काही घरगुती उपाय आहेत. ज्यात हळद आणि आवळ्याचा समावेश आहे.
या दोघांचे एकत्र सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हर नियंत्रणात राहण्यास मदत होते. आवळ्यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि हायपोग्लासेमिक गुण असतात ज्यामुळे शरीरातील ब्लडल शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते.
याशिवाय याच्या सेवनाने शुगर स्पाईकचा धोका कमी होतो. ब्लड शुगल कंट्रोल होण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून असं समोर आलंय की हळदीच्या सेवनाने इंसुलिन संवेदनशीलतेत सुधारणा होण्यास मदत होते. डायबिटीस कंट्रोल होण्यास मदत होते. नियमित हळद, आवळ्याचे सेवन केल्यानं अनेक आजारांपासून बचाव होतो.
रात्री किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट होतो? 'या' ४ वस्तू कोपऱ्यात ठेवा; २ मिनिटांत झुरळं गायब
डायबिटीसमध्ये हळद आणि आवळ्याचे सेवन कसे करावे
डायबिटीस कंट्रोलसाठी तुम्ही हळद आणि आवळा पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या. रोज सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा ही पावडर घ्या. कोमट पाण्याबरोबर याचे सेवन करा. जेवणाच्या १ तास आधी तुम्ही या पावडरचे सेवन करू शकता. नियमित स्वरूपात हळद, आवळ्याचे सेवन केल्यानं ब्लड शुगल लेव्हल नियंत्रणात राहते. याशिवाय तब्येतीलाही बरेच फायदे मिळतात.