Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आंब्याची पाने खाल्ल्याने शुगर नियंत्रणात येते हे खरे की खोटे?

आंब्याची पाने खाल्ल्याने शुगर नियंत्रणात येते हे खरे की खोटे?

Diabetes: These Leaves Can Lower Your Blood Sugar Levels Effectively; Learn How To Use Them आंब्याची पाने खाणे किंवा रस पिणे यानं वाढलेली साखर नियंत्रणात येते असे दावे केले जातात ते कितपत खरे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 06:06 PM2023-03-14T18:06:34+5:302023-03-14T18:10:21+5:30

Diabetes: These Leaves Can Lower Your Blood Sugar Levels Effectively; Learn How To Use Them आंब्याची पाने खाणे किंवा रस पिणे यानं वाढलेली साखर नियंत्रणात येते असे दावे केले जातात ते कितपत खरे?

Diabetes: These Leaves Can Lower Your Blood Sugar Levels Effectively; Learn How To Use Them | आंब्याची पाने खाल्ल्याने शुगर नियंत्रणात येते हे खरे की खोटे?

आंब्याची पाने खाल्ल्याने शुगर नियंत्रणात येते हे खरे की खोटे?

आंब्याची पानं खाल्ल्यानं किंवा त्याचा रस किंवा ती पाने पाण्यात उकलवून प्याल्यानं खरंच शुगर कण्ट्रोल होते का? हल्ली समाजमाध्यमात फिरणारे मेसेज तसा दावा करत असतात. मात्र त्याची सत्य असत्यता न तपासता स्वत:वर तसे प्रयोग करणं किंवा बेलाशक ते फॉरवर्ड करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळेच आंब्याच्या पानांमुळे शुगर कमी होते, किंवा नियंत्रणात राहते का हा प्रश्न तपासून पहायला हवा. तज्ज्ञांनाच त्या संदर्भात सल्ला विचारायला हवा(Diabetes: These Leaves Can Lower Your Blood Sugar Levels Effectively; Learn How To Use Them).

एमडी आयुर्वेदीक डॉक्टर असलेल्या वैद्य राजश्री कुलकर्णी सांगतात, ''आंब्याच्या पानांचे सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात येते, असा कोणताही वैज्ञानिक दावा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, याच्या निगडीत अभ्यासानुसार, आंब्याच्या पानांचा काढा किंवा रस प्यायल्याने शरीरात असलेल्या इन्शुलिनचे प्रमाण नियंत्रणात येते. यासह कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळीही नियंत्रणात राहते. आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळते, जे डायबिटीस आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. या उपायामुळे शरीराला कोणते दुष्परिणाम होतील असे काही साईडइफेक्ट्स मात्र अद्याप समोर आलेले नाहीत.''

शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रोज किती पाणी प्यायला हवे? कमी पाणी पिण्याचा शुगरचा त्रास वाढण्याशी असतो संबंध?

मात्र विविध वेबसाईट यासंदर्भात दावे करत असतात. प्युबमेड सेन्ट्रल या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, आंब्याच्या पानांमध्ये विविध फायटोकेमिकल्स असतात, ज्यात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये मॅंगीफेरिल कंपाऊंड देखील असते, ज्यामुळे  साखर नियंत्रणात राहते.

काय सांगता रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिऊ नये? तज्ज्ञ सांगतात, रात्री जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम

आंब्याच्या अनेक प्रकारात ‘लंगडा आंबा’ सर्वात उत्तम मानला जातो. त्यात पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळते, जे डायबिटीज आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. काहीजण आंब्याच्या पानांचा रस, किंवा पाण्यात आंब्याची पानं उकळवून किंवा पाने वाळवून त्याची भुकटी करुन खातात. मात्र यासाऱ्याला ठोस पाठबळ नाही. त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेतल्याशिवाय असे उपाय करु नयेत.

Web Title: Diabetes: These Leaves Can Lower Your Blood Sugar Levels Effectively; Learn How To Use Them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.