डायबिटीसचा आजार सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकांमध्ये दिसून येतो. सुरूवातीला फक्त वयस्कर लोकांमध्येच हा आजार जाणवतो असा समज होता. पण आता लहान मुलांसह तरूणांमध्येही या आजाराची वाढती प्रकरणं पाहायला मिळत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील अनियमिततेमुळे लोकांमध्ये डायबिटीसचा धोका अकाली वाढत आहे. हा एक आजार आहे जो हळूहळू शरीराला पोकळ बनवतो.
आरोग्य तज्ञांच्या मते, कोणत्याही स्थितीचे निदान करण्याची पहिली पायरी म्हणजे त्याच्या प्रमुख लक्षणांकडे लक्ष देणे. सामान्य सर्दी असो किंवा फ्लू, हृदयरोग किंवा डायबिटीस असो, शरीरात दिसणाऱ्या लक्षणांच्या आधारे समस्या सहज शोधता येते. डॉक्टर म्हणतात, डायबिटीसची समस्या शोधणे खूप सोपे आहे. डायबिटीसचे रुग्ण तोंडात असे काही बदल पाहू शकतात, ज्याच्या आधारे ही समस्या सहज ओळखता येते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डायबिटीस असल्याचं लवकरात लवकर कळले तर या आजाराची तीव्रता कमी करता येऊ शकते.
अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय
तोंड कोरडं पडणं
जर तुम्हालाही पुन्हा पुन्हा कोरड्या तोंडाची समस्या भेडसावत असेल तर काळजी घ्या. खरं तर, रक्तातील साखरेची पातळी तोंडातील लाळेच्या उत्पादनावर परिणाम करू शकते. जर साखर अनियंत्रितपणे वाढली तर लाळेचे उत्पादन कमी होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला वारंवार कोरड्या तोंडाची समस्या येऊ शकते. कालांतराने, या समस्येमुळे तोंडात फोड आणि अल्सरचा धोका देखील होऊ शकतो. वारंवार कोरडे तोंड होणं डायबिटीसचे संभाव्य लक्षण मानले जाते, त्याकडे दुर्लक्ष करू नका.
संक्रमणाचा धोका वाढणं
डायबिटीसमध्ये अनेक कारणांमुळे तोंड किंवा जीभेत संसर्ग होण्याचा उच्च धोका असतो. जर तुम्हाला तुमच्या जीभ किंवा गालाच्या आतील भागात वारंवार संक्रमण होत असेल, तसेच बरे होण्यास तुलनेने जास्त वेळ लागत असेल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हे डायबिटीसचे लक्षण असू शकते अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट
जीभ आणि तोंडात जळजळ
वारंवार कोरडे तोंड किंवा डायबिटीसच्या संसर्गाच्या समस्यांमुळे लोकांना जीभेवर किंवा तोंडात जळजळ होऊ शकते. काही लोकांना तोंडात मुंग्या येणे आणि जीभ सुन्न होण्याचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हालाही अशा समस्या येत असतील तर सावधगिरी बाळगा, हे डायबिटीसचे लक्षण असू शकते. याबद्दल त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जखम लवकर बरी न होणं
डायबिटीस असताना रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होतो, याशिवाय, रक्तातील साखरेची उच्च पातळी देखील उपचार प्रक्रियेवर परिणाम करते. जर तुमच्या तोंडाचे व्रण किंवा फोड बरे होण्यास बराच वेळ लागत असेल तर ते डायबिटिसचे लक्षण असू शकते. या परिस्थितीत, रोगाच्या निदानासाठी त्वरित चाचणी करणं आवश्यक होते.