भारतीय लोक सुरूवातीपासूनच चहाचे खूप शौकिन आहेत. कोणत्याही वेळेला चहा दिला तरी काहीजण चहा प्यायला तयार असतात. सकाळी उठल्यानंतर बरेचजण आपल्या दिवसाची सुरूवात चहा, कॉफीनं करतात. तर काहीजण रात्री झोपतानासुद्धा चहा पितात. एवढेच नाही तर घरात पाहुणे आले किंवा मित्र बाहेर कुठेतरी भेटले तरी. लोक सर्वत्र चहा पितात. पण तुम्हाला माहीत आहे का हर्बल टी आपल्याला डायबिटिसच्या आजारात खूप मदत करू शकते.
काही हर्बल टी अशा आहेत ज्यामुळे डायबिटीक रुग्णाची साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास खूप मदत करतात. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांचे नियमित सेवन करू शकता. डायबिटीक रुग्णांसाठी याप्रकारच्या चहाचे सेवन फायदेशीर ठरते. फिजिशियन डॉ. राजन गांधी यांनी अमर उजालाशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.
ग्रीन टी
ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील जळजळ कमी होते, इन्सुलिन नियंत्रणात राहते आणि खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्याचे काम देखील करते. ग्रीन टीमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स तुम्हाला हे फायदे देण्याचे काम करतात. म्हणूनच तुम्ही रोज सकाळी ग्रीन टी प्यावा. अरे व्वा! फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा
दालचिनीचा चहा
आपण दालचिनी चहा तयार करू शकता आणि त्याचे नियमित सेवन करू शकता. हे लठ्ठपणा कमी करते आणि त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स मधुमेही लोकांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही रोज याचे सेवन करू शकता. वजन कमी करण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते.
जास्वंदाचा चहा
आपण जास्वंदाचा चहा घेऊ शकता, जो तिखट आणि गोड दोन्ही चवीचा असतो. जास्वंदात सेंद्रिय एसिड, पॉलीफेनॉल, अँथोसायनिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे इंसुलिन प्रतिरोध सुधारण्यासाठी कार्य करतात. यामुळे व्यक्तीची रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे या चहाचे सेवन अत्यंत फायदेशीर मानले जाते. 'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका
काळा चहा
ब्लॅक टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर काळ्या चहाचे नियमित सेवन केल्याने ते इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रित करते. आपण दररोज 2-3 वेळा काळ्या चहा पिऊ शकता.