Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Diabetes type 2 : वाढलेली शुगर लेव्हल झटपट होईल कमी फक्त 'हे' काम करा; डायबिटीस रुग्णांसाठी एक्सपर्ट्सच्या खास टिप्स

Diabetes type 2 : वाढलेली शुगर लेव्हल झटपट होईल कमी फक्त 'हे' काम करा; डायबिटीस रुग्णांसाठी एक्सपर्ट्सच्या खास टिप्स

Diabetes type 2 : दुसरीकडे, टाइप २ डायबिटीसनं ग्रस्त लोक, जर त्यांनी आठवड्यातून तीन ते चार तास व्यायाम करू शकतात. त्यामुळे मृत्यूचा धोका देखील कमी होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:22 PM2021-08-26T12:22:23+5:302021-08-26T12:57:22+5:30

Diabetes type 2 : दुसरीकडे, टाइप २ डायबिटीसनं ग्रस्त लोक, जर त्यांनी आठवड्यातून तीन ते चार तास व्यायाम करू शकतात. त्यामुळे मृत्यूचा धोका देखील कमी होतो.

Diabetes type 2 : Best time of the day to exercise to lower high blood sugar check experts advise | Diabetes type 2 : वाढलेली शुगर लेव्हल झटपट होईल कमी फक्त 'हे' काम करा; डायबिटीस रुग्णांसाठी एक्सपर्ट्सच्या खास टिप्स

Diabetes type 2 : वाढलेली शुगर लेव्हल झटपट होईल कमी फक्त 'हे' काम करा; डायबिटीस रुग्णांसाठी एक्सपर्ट्सच्या खास टिप्स

Highlightsफिरायला जाताना किंवा व्यायामादरम्यान गोड ग्लुकोजच्या गोळ्या अवश्य सोबत ठेवा. जेणेकरून तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास तुम्ही ते घेऊ शकता.जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल तर व्यायामापूर्वी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी 100 mg/dL असेल तर एक फळ खा.

डायबिटीस हा जीवनशैलीशी निगडित असलेला गंभीर आजार आहे. हा आजार उद्भवल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. टाईप २ डायबिटीस असल्यास खाण्यापिण्यापासून व्यायामापर्यंत सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.  टाईप २ डायबिटीसची समस्या लठ्ठपणा, खराब जीवनशैली, चुकीच्या आहारामुळे उद्भवते. डायबिटीसमुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी डॉक्टर योग्य आहार आणि व्यायामाची शिफारस करतात. या व्यतिरिक्त, औषधं आणि इन्सुलिन थेरपी सारखे उपचारसुद्धा केले जातात. 

हार्वर्डच्या अहवालानुसार डायबिटीसच्या रुग्णासाठी सर्व प्रकारचे व्यायाम फायदेशीर ठरू शकतात. आपण आपल्या दिनचर्येमध्ये एरोबिक, रेजिस्टेंस एक्सरसाइज किंवा दोन्ही प्रकारचे व्यायाम समाविष्ट करू शकता. मधुमेही रुग्णांमध्ये, हा व्यायाम HbA1c कमी करण्याचे काम करतो.

एरोबिक आणि  रेजिस्टेंस एक्सरसाइज

हे दोन्ही व्यायामप्रकार लठ्ठपणा कमी करण्यासोबत, स्थूल वृद्ध लोकांमध्ये इंसुलिन कमी करण्यास मदत करतात. अधिक फायदे मिळवण्यासाठी हे दोन्ही व्यायाम प्रकार एकत्र करायला हवे. हार्वर्डच्या अहवालानुसार, जे डायबिटीस रुग्ण आठवड्यातून दोन तास चालतात. त्यांना हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका कमी असतो.

दुसरीकडे, टाइप २ डायबिटीसनं ग्रस्त लोक, जर त्यांनी आठवड्यातून तीन ते चार तास व्यायाम करू शकतात. त्यामुळे मृत्यूचा धोका देखील कमी होतो. काही महिलांमध्येही असेच दिसून आले आहे. संशोधनानुसार, ज्या महिला आठवड्यातून चार तास व्यायाम करतात किंवा उच्च तीव्रतेचे व्यायाम करतात त्यांच्यात हृदयरोगाचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो. 

डायबिटीस आणि एक्सरसाईजमधील संबंध 

डायबिटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारच्यावेळी व्यायाम करणं फायदेशीर ठरतं. या अभ्यासानुसार टाईप२ डायबिटीसचे रुग्ण दुपारच्यावेळी हाय इंटेसिटी वर्कआऊट करत असतील तर त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. Express.co.uk च्या रिपोर्टनुसार सकाळच्यावेळी हाय इंटेसिटी वर्कआऊट केल्यानं ग्लूकोजच्या पातळीत नकारात्मक परिणाम दिसून येतो. 

डॉक्टर जेफ फोस्टर यांनी Express.co.uk ला सांगितले की,  ''व्यायामासाठी योग्य वेळ नाही. त्यापेक्षा तुम्ही त्यासाठी योग्य दिनचर्या बनवा.''  हार्वर्डच्या अहवालात असे म्हटले आहे की सामान्यतः व्यायाम करण्याची योग्य वेळ जेवणानंतर तीन किंवा चार तास असते. या काळात रक्तातील साखरेची पातळी बऱ्याचदा वाढते.

व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल तर व्यायामापूर्वी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी 100 mg/dL असेल तर एक फळ खा. जेणेकरून तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य राहील. याशिवाय, फळे खाल्ल्यानंतर आणि व्यायामानंतर अर्ध्या तासानंतर, पुन्हा तपासा, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य आहे की नाही.

१) जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल आणि तुम्ही खूप व्यायाम केला असेल तर तुम्हाला 6 ते 12 तासांनंतर हायपोग्लाइसीमियाची पातळी वाढू शकते. म्हणून, आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासून पाहा.

२) तुमच्या रक्तातील साखरेची पातळी 250 पेक्षा जास्त असल्यास व्यायाम करणे टाळा. कारण व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते.

३) तज्त्रांचे म्हणणे आहे की इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांनी नेहमी हातावर मेडिकल अर्लट ब्रेसलेट घालावे.  जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी ट्रॅक करता येऊ शकते. 

४) फिरायला जाताना किंवा व्यायामादरम्यान गोड ग्लुकोजच्या गोळ्या अवश्य सोबत ठेवा. जेणेकरून तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास तुम्ही ते घेऊ शकता.

व्यायाम करण्याचे फायदे

रक्तदाब नियंत्रणात राहतो

बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते

गुड कोलेस्ट्रॉलयुक्त वाढते

मासपेशी आणि हाडं मजबूत होतात

अशक्तपणा कमी होतो

Web Title: Diabetes type 2 : Best time of the day to exercise to lower high blood sugar check experts advise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.