शरीराला योग्य कार्य करण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते (Vitamin D). प्रोटीन, कॅल्शियम आणि लोहाप्रमाणेच, व्हिटॅमिन डी देखील एक पोषक तत्व आहे, जे शरीराला उत्तम कार्यासाठी आवश्यक आहे (Lifestyle Changes). व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते, जे हाडे आणि दातांसाठी आवश्यक आहे (Health Tips). पण याच्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिससारखे आजार होऊ शकतात.
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. पण सध्या पावसाळा सुरू आहे. जर आपल्याला सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळत नसेल तर, आहारात काही पदार्थांचा समावेश करा. शिवाय जीवनशैलीत काही बदल करून पाहा. यामुळे नक्कीच व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करता येईल(Diet and Lifestyle Tips to Avoid Vitamin D Deficiency).
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं
थकवा
स्नायू दुखणे
हाडांमध्ये वेदना
खराब - चवीला कडू शेंगदाणे ओळखायचे कसे? खरेदी करण्यापूर्वी 'असे ' पाहा, शेंगदाणे खवट आहेत का..
मूड स्विंग्स
कमकुवत रोगप्रतिकारशक्ती
व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न खा
काही पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. एनसीबीआयच्या मते, 'दूध, दही, संत्री, गहू, बार्ली आणि इतर धान्यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. त्यात याव्यतिरिक्त व्हिटॅमिन बी१, बी२, बी५, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते.
जीवनशैलीत बदल
नियमित व्यायाम करा, सकस आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. या गोष्टी जीवनशैलीत बदल केल्याने एकंदरीत आरोग्य सुधारण्यास आणि व्हिटॅमिन डीचे शोषण वाढविण्यात मदत करू शकतात.
व्हिटॅमिन डी पूरक आहार घ्या
जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर, पोषणतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.