पावसाळा हा ऋतू तसा सगळ्यांच्याच आवडीचा. पावसाळ्यात मुसळधार पावसाचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. पावसाळा आपल्याला कितीही आनंददायक व सुख देणारा वाटत असला तरीही पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळा येतो तो मुळातच आजारपण घेऊन. पावसाळ्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात मौसमी आजार आणि अनेक प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते(Diet and Nutritional tips to stay healthy in the monsoon season).
प्रत्येक ऋतूत निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आहार आणि लाईफस्टाईलमध्ये वेगवेगळे बदल करणे आवश्यक असते. पावसाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली नाही तर आपण आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत कोणते बदल करावेत, ते जाणून घ्या. आहारतज्ज्ञ नंदिनी याबद्दल अधिक माहिती देत आहेत(How to Stay Healthy During Monsoon).
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत असे करा बदल...
१. तज्ज्ञांच्या मते या ऋतूमध्ये त्वचेच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत, कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरेल.
कडुनिंबामध्ये अँटी - बॅक्टेरियल आणि अँटी - फंगल गुणधर्म असतात. हे त्वचेला होणाऱ्या अनेक संसर्गापासून त्वचेचे संरक्षण करते.
२. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढते, या ऋतूत डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो. असे होऊ नये म्हणून कडुलिंबाची पाने सुकवून जाळून त्याचा धूर करा त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होईल.
३. पावसाळ्यात कपडे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच ते वापरावेत. विशेषत: अंडरगारमेंट्स पूर्णपणे कोरडे झाल्याशिवाय घालू नका. यामुळे योनिमार्गात संसर्ग होण्याचा धोका असतो.
पाठीवर मुरुम? अनेक उपाय करूनही कमी होत नाहीत, पाहा कारण आणि असरदार खास उपाय...
४. पावसाळा व हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये हवेत गारवा अधिक प्रमाणात असतो. यामुळे आपल्याला फारशी तहान लागत नाही. त्यामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. पण, या ऋतूतही शरीराला पुरेशा प्रमाणात हायड्रेशनची गरज असते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.
५. पावसाळ्यात उकळवून घेतलेलेच पाणी कोमट करुन प्यावे.
६. आपल्या डाएटमध्ये आलं आणि तुळशीचा वापर करून बनवलेला काढा अवश्य प्यावा. त्यामुळे या ऋतूंत होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केस मोकळे सोडून झोपावे की बांधून ? पाहा काय आहे नक्की बेस्ट ऑप्शन...
७. स्वतःला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी योगा, एक्सरसाइज रोज न चुकता करा.
८. कडक उन्हानंतर मान्सूनचे अचानक आगमन झाले की, लोक उन्हाळ्याशी संबंधित सवयी जसे की थंड पाणी पिणे, थंड पाण्याने आंघोळ करणे आणि एसीमध्ये राहणे या सवयी पाळतात. पण तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात या सवयी बदलायला हव्यात.
९. पावसाळ्यात शिळे व बाहेरचे उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
आहार आणि जीवनशैलीशी संबंधित हे बदल तुम्हाला पावसाळ्यात निरोगी राहण्यास मदत करू शकतात.