Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तीळ-आवळा- शेवगा, फक्त 3 गोष्टी खा - शरीराला मिळेल भरपूर कॅल्शियम, हाडं कमकुवत होणं टाळा

तीळ-आवळा- शेवगा, फक्त 3 गोष्टी खा - शरीराला मिळेल भरपूर कॅल्शियम, हाडं कमकुवत होणं टाळा

कॅल्शियम सप्लीमेण्टस घेण्याची गरज पडू नये याची काळजी कायम घ्यायला हवी .आहारात रोज 3 गोष्टी ( diet for calcium) असल्यास वाढत्या वयात, मेनोपाॅजमध्ये किंवा वृध्दत्वात गोळ्या औषधांच्या स्वरुपात कॅल्शियम घेण्याची गरज पडत (how to avoid calcium deficiency) नाही. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होवून आरोग्य समस्या निर्माण होत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 02:04 PM2022-07-22T14:04:14+5:302022-07-22T14:16:08+5:30

कॅल्शियम सप्लीमेण्टस घेण्याची गरज पडू नये याची काळजी कायम घ्यायला हवी .आहारात रोज 3 गोष्टी ( diet for calcium) असल्यास वाढत्या वयात, मेनोपाॅजमध्ये किंवा वृध्दत्वात गोळ्या औषधांच्या स्वरुपात कॅल्शियम घेण्याची गरज पडत (how to avoid calcium deficiency) नाही. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होवून आरोग्य समस्या निर्माण होत नाही.

Diet is important to avoid calcium deficiency ... 3 things in diet for getting calcium naturally. | तीळ-आवळा- शेवगा, फक्त 3 गोष्टी खा - शरीराला मिळेल भरपूर कॅल्शियम, हाडं कमकुवत होणं टाळा

तीळ-आवळा- शेवगा, फक्त 3 गोष्टी खा - शरीराला मिळेल भरपूर कॅल्शियम, हाडं कमकुवत होणं टाळा

Highlightsशरीरात पुरेसं ड जीवनसत्व नसेल तर कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. आवळ्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं तसंच आतड्यांची कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमताही आवळ्यामुळे वाढते. शेवग्याच्या शेंगासोबतच शेवगाचा पाला खाणंही कॅल्शियमसाठी महत्वाचं असतं. 

कॅल्शियम  (calcium) हे खनिज आपल्या शरीरात उपलब्ध असलेलं महत्वाचं खनिज आहे. सुदृढ आरोग्यासाठी कॅल्शियमची भूमिका (calcium for healthy bones)  खूप महत्वाची असते. शरीरात उपलब्ध असलेल्या एकूण कॅल्शियमपैकी 99 टक्के कॅल्शियम हाडं आणि दातांमध्ये असतं. उरलेलं 1 टक्का कॅल्शियम रक्तात आणि शरीरातील नाजूक पेशींमध्ये असतात. हाडं आणि दातांचं आरोग्य नीट राहाण्यासठी,हदय निरोगी राहाण्यासाठी आणि मज्जा संस्थेच्या कार्यातही कॅल्शियम महत्वाचं असतं. 
पण वय वाढत जातं तसं शरीराला 1 हजार मिलीग्रॅम कॅल्शियम  मिळायला हवं असं वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात. किशोरवयीन मुलांमध्ये, मेनोपाॅज आलेल्या महिलांना आणि वृध्दांना जास्तीच्या कॅल्शियमची आवश्यकता (calcium deficiency)  गरज अधिक असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी कॅल्शियम सप्लीमेण्टस घेण्याची गरज पडू नये याची काळजी कायम घ्यायला हवी असं आयुर्वेद तज्ज्ञ दीक्षा भावसार म्हणतात. त्यांच्या मते आहारात रोज 3 गोष्टी असल्यास  (diet for calcium) वाढत्या वयात, मेनोपाॅजमध्ये किंवा वृध्दत्वात गोळ्या औषधांच्या स्वरुपात कॅल्शियम घेण्याची गरज पडत नाही. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होवून आरोग्य समस्या निर्माण होत नाही. 

Image: Google

दीक्षा भावसार यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउण्टवरुन कॅल्शियम संबंधीची महत्वाची माहिती शेअर केली आहे.  दीक्षा भावसार म्हणतात, मेनोपाॅजदरम्यान, थायराॅइड ग्रंथीचं असंतुलन, केस गळणं, सांधे दुखणं, चयापचय बिडणं, हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होणं या समस्यांचं मूळ शरीरात निर्माण झालेल्या कॅल्शियमच्या कमतरतेत असतं. शरीरात जर ड जीवनसत्वाची कमतरता असेल तर कॅल्शियमची कमतरताही निर्माण होते. कारण शरीरात जर ड जीवनसत्व पुरेसं असेल तर आतड्यांकडून आहारातील घटकातून कॅल्शियम शोषलं जातं. पण शरीरात जर ड जीवनसत्वाची कमतरता असेल तर मात्र आतड्यांमध्ये आहारातील कॅल्शियम शोषण्याची क्षमता नसते आणि त्यातून शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते.  कॅल्शियमची कमतरता निर्माण होवू नये याकडे लक्ष देताना शरीराला ड जीवनसत्व पुरेसं मिळायला हवं याचीही काळजी घ्यायला हवी. 20 मिनिटं रोज कोवळ्या उन्हात बसलं तर शरीराला पुरेसं ड जीवनसत्व मिळतं. कॅल्शियमसाठी डाॅ. दीक्षा  भावसार आवळा, तीळ आणि शेवगा या तीन गोष्टी रोजच्या आहारात असण्याला महत्व देतात. 

Image: Google

आवळा

आवळ्यामध्ये क जीवनसत्व, लोह आणि कॅल्शियम हे तीन घटक असतात. आवळा हा कोणत्याही स्वरुपात सेवन केला तरी चालतो. नुसता आवळा खाणं, आवळ्याची पावडर सेवन करणंं, आवळ्याचा ज्यूस पिणं, च्यवनप्राश, आवळा कॅण्डी या स्वरुपात आवळा खायला हवा. रोज आवळा खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. केस आणि त्वचेचा पोत सुधारतो. आवळ्यात असलेल्या फायबरमुळे पचनास मदत होते. वाढत्या वयातही हाडं मजबूत ठेवण्यासाठी आवळा हा खायलाच हवा असं दीक्षा भावसार सांगतात.  आवळ्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं तसंच आतड्यांची कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमताही आवळ्यामुळे वाढते. आवळ्यातील घटक हाडातील पेशींना सुरक्षित ठेवतात, त्यांना तुटण्यापासून वाचवतात. आवळ्यात असलेल्या सूज आणि दाह विरोधी गुणधर्मांमुळे हाडांना सूज येत नाही. 

Image: Google

शेवगा

शेवग्याच्या शेंगासोबतच शेवग्याचा पाला आहारात असणं आवश्यक आहे. शेवग्याच्या पाल्यात कॅल्शियम, लोह, अ आणि क जीवनसत्व आणि मॅग्नेशियम हे घटक असतात. शेवग्यात आणि शेवग्याच्या पाल्यात भरपूर खनिजं असतात. यातील कॅल्शियमचं प्रमणही चांगलं असतं. वरचेवर आहारात शेवग्याच्या शेंगासोबतच शेवग्याच्या पानांचं चूर्ण रोज सकाळी उपाशी पोटी घ्यायला हवं. 

Image: Google

तीळ

शरीराला कॅल्शियम मिळण्यासाठी कच्चे तीळ खाणं फायदेशीर असतात. चविष्ट पध्दतीनं तिळाचा समावेश आहारात करण्यासाठी 1 मोठा चमचा पांढरे किंवा काळे तीळ घ्यावेत. ते कोरडेच भाजावेत. भाजलेल्या तिळामध्ये 1 चचमा गूळ आणि 1 चमचा तूप  घालून ते नीट मिसळून त्याचा लाडू करुन खाल्ल्यास त्याचा फायदा होतो.
आवळा, तीळ्, शेवगा या तीन पदार्थांप्रमाणेच दूध, दुधाचे पदार्थ, बदामाचं दूध, सोया दूध, सोया पनीर, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, भेंदी, मटार, घेवडा, नागली, ज्वारी, राजगिरा, बाजरी, बदाम आणि कोरडे अंजीर यांच्यातही कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं. आपल्या रोजच्या आहाराचं नीट नियोजन केल्यास शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होणार नाही असं डाॅ. दीक्षा भावसार म्हणतात. 

Web Title: Diet is important to avoid calcium deficiency ... 3 things in diet for getting calcium naturally.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.