सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आहार घेण्याच्या निष्काळजीपणामुळे लोकांमध्ये डायबिटीसचा धोका वाढत आहे. डायबिटीसचा आजार झाल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे खूप महत्वाचे ठरते. सध्या देशातील सुमारे 70 दशलक्ष लोक डायबिटीसने ग्रस्त आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली आणि लोकांनी खबरदारी घेतली नाही, तर आकडेवारीनुसार, 2030 पर्यंत ही संख्या वाढून 101 दशलक्ष होईल, ही चिंताजनक बाब आहे. तज्ञांच्या मते, टाइप 2 डायबिटीसवर योग्य वेळी उपचार न केल्यास घातक ठरू शकतं. नुकत्याच यूकेच्या एका डॉक्टरने असा दावा केला आहे की त्यांनी कोणत्याही औषधाशिवाय केवळ आहारात बदल करून जवळपास 100 रुग्णांमधली डायबिटीसची समस्या बरी केली आहे.
डायबिटीसपासून सुटका मिळवण्यासाठी लो कार्बोहायड्रेट्स
साउथ पोर्टमधील नॉरवुड सर्जरीचे डॉ. डेव्हिड उरविन यांच्या मते, कार्बयुक्त आहार घेतल्याने टाइप 2 डायबिटिस होण्याचा धोका जास्त असतो. कार्बोहायड्रेट्सच्या माध्यमातून ग्लुकोजच्या स्वरूपात शरीराला ऊर्जा मिळते. तज्ज्ञांनी कमी कार्बयुक्त आहार आणि नियंत्रित आहाराने स्थिती पूर्ववत होण्यास मदत होते का? हे जाणून घेण्यासाठी असा प्रयोग करून पाहिला होता.
डॉ उर्विन काय सांगतात?
डॉ. उर्विन यांच्या मते, कमी कार्बयुक्त आहार घेतल्यानं तुम्ही डायबिटीस वाढण्यापासून बऱ्याच प्रमाणात रोखू शकता किंवा त्यापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकता. कमी कार्ब आहारात, आपल्याला धान्य, स्टार्चयुक्त भाज्या आणि इतर कार्बयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात वापरावे लागतात. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात कॅलरीज घेण्यासाठी तुम्ही कार्बोहायड्रेटऐवजी प्रोटिन्स आणि गुड फॅट्स घेऊ शकता.
लो कार्ब आहार
लो कार्ब आहार हा एक असा आहार आहे ज्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट पूर्णपणे काढून टाकले जातात. या अभ्यासात 23 चाचण्यांमधील डेटा वापरण्यात आला. ज्यात 1357 लोकांनी सहभाग घेतला. असे आढळून आले की कमी कार्बयुक्त आहार घेत असलेल्या रुग्णांच्या शरीरातील शुगरचे प्रमाण कमी झाले. डॉक्टरांच्यामते आजकाल डायबिटिससाठी इन्सुलिन आवश्यक आहे, परंतु इन्सुलिनचा शोध लागण्यापूर्वीच डायबिटीसचे व्यवस्थापन करण्यासाठी लो-कार्ब आहार वापरला जात होता.
लो कार्ब डाइटचा आणि डायबिटीसचा काय संबंध?
रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी कमी कार्बयुक्त आहार अतिशय फायदेशीर आहे. कमी कार्बयुक्त अन्न रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण कमी करून ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ग्लुकोजमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. इन्सुलिन शरीरात फॅट्स साठवण्याचे काम करते.
जीवनशैलीत असा करा बदल
टाईप 2 डायबिटीस टाईप 1 डायबिटीसपेक्षा सामान्य आहे. टाईप २ डायबिटीसमध्ये लोकांना आपली स्थिती व्यवस्थित ठेवण्यसाठी इंसुलिनची गरज भासते. टाइप 2 डायबिटीस हा जीवनशैलीचा एक आजार आहे. म्हणून रोजच्या जीवनात काही गोष्टींची काळजी घेऊन डायबिटीस नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
निरोगी आणि संतुलित आहार घेणे.
नियमित व्यायाम
वाढलेले वजन कमी करा.
ब्रेड, स्टार्चयुक्त भाज्या, पास्ता, बीन्स, मध, लस्सी, चिप्स, दूध, भात, साखर कँडी, साखर, मैदा, कुकीज, कंडेन्स्ड मिल्क हे सर्व पदार्थ डायबिटीसच्या रुग्णंनी बाबतीत टाळावेत. हिरव्या भाज्या, मांस, नट, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ चांगल्या प्रमाणात घेतल्यास डायबिटीस बरा होण्याची शक्यता खूप जास्त असेल. जर तुम्हाला देखील टाइप 2 डायबिटीसचा त्रास असेल तर ते लवकरात लवकर नियंत्रित करण्यासाठी कमी कार्बोहायड्रेट आहार घेणं सुरू करा. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.