Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत ॲसिडीटी होते? अशावेळी काय खावे, काय खाऊ नये, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

सतत ॲसिडीटी होते? अशावेळी काय खावे, काय खाऊ नये, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

Diet tips For Acidity : आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास ॲसिडीटीची समस्या दूर ठेवणे सोपे जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 04:20 PM2023-06-23T16:20:36+5:302023-06-23T16:22:21+5:30

Diet tips For Acidity : आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास ॲसिडीटीची समस्या दूर ठेवणे सोपे जाते.

Diet tips For Acidity : Have persistent acidity? Ayurveda experts say what to eat and what not to eat in such a situation... | सतत ॲसिडीटी होते? अशावेळी काय खावे, काय खाऊ नये, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

सतत ॲसिडीटी होते? अशावेळी काय खावे, काय खाऊ नये, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

डॉ संदीप काळे 

अॅसिडीटी ही अनेकांना सातत्याने उद्भवणारी समस्या. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. न पचलेले अन्न शरीर एकतर बाहेर टाकते किंवा ते शरीरात एकप्रकारे कुजते. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले नाही तर अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. कधी सतत येणारे ढेकर तर कधी गॅसेस आपला पिच्छा पुरवतात. कधी भूक लागल्यावर खाल्लं नाही तर किंवा कधी भुकेपेक्षा ४ घास जास्त खाल्ले तरी अॅसिडीटी होते. काही वेळा झोप झाली नाही किंवा रुटीनमध्ये काही बदल झाला तर त्याचा परीणाम लगेचच आपल्या पचनसंस्थेवर होतो आणि आपल्याला खूप जास्त प्रमाणात अॅसिडीटी होते. कधी काही घरगुती उपाय करुन तर कधी आपल्याला माहित असलेली औषधे घेऊन यावर आराम मिळवला जातो. इतकेच नाही तर पचनाच्या तक्रारी जास्त झाल्या तर डॉक्टरांकडे जाऊनही औषधे घेतली जातात. मात्र आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास अॅसिडीटीची समस्या दूर ठेवणे सोपे जाते (Diet tips For Acidity). 

मुळात आयुर्वेदानुसार अॅसिडीटीचे दोन प्रकार केले जातात पहिला प्रकार म्हणजे अन्न पचत नाही म्हणजे बाईल मधली अॅसिड लेवल कमी होते त्याच्यामुळे अन्न पोटामध्ये पडून राहतं त्याला आंबूस वास येतो आणि मग सकाळी आपण उलटीद्वारे ते बाहेर काढतो. या प्रकारामध्ये  पित्तातील कफाचे प्रमाण वाढते. अशावेळी गरम पाणी पिल्याने, तिखट पदार्थ खाल्ल्याने किंवा उलटी केल्यानंतर बरं वाटतं. दुसऱ्या प्रकारात सतत पोट रिकामा राहणं, टेन्शन घेणे, सतत तणावात असणे, उष्णते जवळ काम करणं, उन्हात काम करणं यामुळे पित्तातील उष्ण गुण किंवा दाहकता वाढते आणि मग उलटी,मळमळ, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवतात. 

उपाय काय? 

(Image : Google)
(Image : Google)

 थंड पदार्थ, थंड गुणाची औषध घेणे लाभदायक ठरते. यामध्ये शतावरी, तुळशीचे बी, सब्जा बी होतो. गार दूध घेतल्यास त्यानेही फायदा होतो. गार पाणी वेळेवर जेवण करावे लागते जेवणात तिखट पदार्थ खाऊ नये, मिरची, मसालेदार पदार्थ खाऊ नये किंवा अर्धपोटी जेवण करावं आणि पुन्हा भूक लागल्यानंतर पुन्हा थोडं काहीतरी खावं असे सोपे घरगुती उपाय केले असता अॅसिडिटी नियंत्रणात राहते किंवा बरी होते. साधारणपणे मटकी, तूर डाळ, वाटाणे, मेथी, शेपू, यांनी अॅसिडीटी वाढते. हे पदार्थ तूप घालून खाल्ल्यास अॅसिडीटीचे प्रमाण कमी होते. यासाठी सकाळी शतावरी चूर्ण आणि दूध सकाळी उठल्यावर घेतल्यास फायदा होतो. 

(लेखक आयुर्वेदतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Diet tips For Acidity : Have persistent acidity? Ayurveda experts say what to eat and what not to eat in such a situation...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.