Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सततच्या ॲसिडीटीने हैराण, छातीत जळजळ होते? चुकूनही खाऊ नका ३ पदार्थ

सततच्या ॲसिडीटीने हैराण, छातीत जळजळ होते? चुकूनही खाऊ नका ३ पदार्थ

Diet Tips If You Have Acidity Problem : आहारात काही पदार्थ आवर्जून वर्ज्य केले तर हा त्रास दूर होण्याची शक्यता असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 10:54 AM2023-06-19T10:54:00+5:302023-06-19T17:22:25+5:30

Diet Tips If You Have Acidity Problem : आहारात काही पदार्थ आवर्जून वर्ज्य केले तर हा त्रास दूर होण्याची शक्यता असते.

Diet Tips If You Have Acidity Problem : Suffering from constant acidity, heartburn? Do not eat at all 3 foods... | सततच्या ॲसिडीटीने हैराण, छातीत जळजळ होते? चुकूनही खाऊ नका ३ पदार्थ

सततच्या ॲसिडीटीने हैराण, छातीत जळजळ होते? चुकूनही खाऊ नका ३ पदार्थ

ॲसिडीटीचा त्रास ज्यांना होतो तेच ही समस्या किती त्रासदायक असते ते सांगू शकतील. आपण दिवसातील ३ ते ४ वेळेला नियमितपणे खात असतो. पण हे खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचतेच असे नाही. सततचे बैठे काम, व्यायामाचा अभाव यांमुळे खाल्लेले अन्न नीट पचले नाही की आपल्याला ॲसिडीटी होते. त्यातही मसालेदार, तेलकट किंवा जंक फूड खाल्ले गेले तर पचनक्रियेवर आणखी ताण येतो. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले नाही तर त्यामुळे अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. यामुळे काहींना सतत करपट ढेकर येतात तर काहींना गॅसेसचा त्रास होतो (Diet Tips If You Have Acidity Problem). 

ॲसिडीटीचा त्रास झाल्यावर छातीत जळजळणे, डोकेदुखी, मळमळ होऊन उलटीसारखे होणे अशा तक्रारी निर्माण होतात. काहीवेळा भूक लागल्यावर खाल्लं नाही तर किंवा कधी भुकेपेक्षा ४ घास जास्त खाल्ले तरी ॲसिडीटी होते. झोप अपुरी झाली, ऊन लागले, दगदग झाली तरी ॲसिडीटी होऊ शकते. एकदा ॲसिडीटी आणि गॅसेसचा त्रास झाला की आपल्याला काही सुधरत नाही. अशी ॲसिडीटी सतत होऊ नये म्हणून आहाराची योग्य ती काळजी घ्यायला हवी. आहारात काही पदार्थ आवर्जून वर्ज्य केले तर हा त्रास दूर होण्याची शक्यता असते. ॲसिडीटीला कारणीभूत ठरणारे हे पदार्थ कोणते, पाहूया... 

(Image : Google)
(Image : Google)

१. कोल्ड्रींक
 
उन्हाळ्याच्या दिवसांत लाहीलाही होत असल्याने आपण घराबाहेर असताना आवर्आजून कोल्ड्रींक घेतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोनेट असते. तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास असेल तर सोडा किंवा कोल्ड्रींक पिणे घातक ठरु शकते, कारण त्यामुळे हा त्रास वाढण्याचीच शक्यता जास्त असते. याशिवाय तुम्ही कोकम सरबत, उसाचा रस, नारळ पाणी अशी नैसर्गिक पेय घ्यायला हवीत.

२. कॉफी 

काहींना काम करताना फ्रेश वाटावे म्हणून कॉफी पिण्याची सवय असते. पण तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त कॉफी पित असाल तर ती आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कॉफीमध्ये असणारं कॅफीन पोटात ॲसिडीटीची निर्मिती करतं. तसंच रीकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणेही ॲसिडीटीसाठी घातक असते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. आंबट फळे

फळं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात, त्यामुळे विविध रंगाची, चवीची फळं आहारात असायला हवीत असं सांगितलं जातं. मात्र तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास असेल तर आंबट फळं खाणं टाळायला हवं. यामध्ये अननस, संत्री, मोसंबी, द्राक्षं यांसारख्या फळांचा समावेश होतो. 

याशिवाय काय काळजी घ्याल

- नियमित ७ ते ८ तास झोप घेणे अतिशय महत्त्वाचे असते. 

- धूम्रपान किंवा मद्यपान ॲसिडीटीसाठी घातक असते. 

- बैठ्या कामामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही, त्यामुळे दर काही वेळाने कामातून ब्रेक घ्या. 
 

Web Title: Diet Tips If You Have Acidity Problem : Suffering from constant acidity, heartburn? Do not eat at all 3 foods...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.