Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कंबर दुखते- गुडघे ठणकतात, थकवा येतो? रोज हे २ पदार्थ पाण्यात भिजवून खा, ताकद वाढेल

कंबर दुखते- गुडघे ठणकतात, थकवा येतो? रोज हे २ पदार्थ पाण्यात भिजवून खा, ताकद वाढेल

Health Benefits Of Soaked Almonds And Chana : भिजवलेले चणे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. चण्यांमध्ये फायबर्स असतात. त्यामुळे गॅसची समस्या कमी होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 12:09 PM2024-07-25T12:09:24+5:302024-07-25T14:46:06+5:30

Health Benefits Of Soaked Almonds And Chana : भिजवलेले चणे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. चण्यांमध्ये फायबर्स असतात. त्यामुळे गॅसची समस्या कमी होते.

Dietician Says Amazing Health Benefits Of Soaked Almonds And Chana For Body Strength And Strong Bones | कंबर दुखते- गुडघे ठणकतात, थकवा येतो? रोज हे २ पदार्थ पाण्यात भिजवून खा, ताकद वाढेल

कंबर दुखते- गुडघे ठणकतात, थकवा येतो? रोज हे २ पदार्थ पाण्यात भिजवून खा, ताकद वाढेल

तुम्हाला नेहमी थकवा आणि कमकुवतपणा येतो. (Tiredness) थोडं काम केल्यानंतर तुम्ही थकता, गुडघे आणि सांध्यांमध्ये नेहमी वेदना होतात, हाडं कमकुवत होतात, चक्कर येते, शरीरात रक्त व्यवस्थित तयार होत नाही, (Bones Pain)हाडांमधून कट-कट असा आवाज येतो आणि सतत झोपण्याची इच्छा होते. असा त्रास होत असेल तर आहारात तुम्ही बदाम आणि चणे खाऊ शकतात. (Health Benefits Of Soaked Almonds And Chana)

भिजवलेले चणे आणि बदाम हे दोन्ही आरोग्यासाठी उत्तम ठरतात. हे भिजवून खाल्ल्याने शरीराला जास्तीत जास्त फायदे मिळतात. कारण चणे भिजवल्याने त्यातील पोषक तत्व वाढतात आणि सहज शोषले जातात. (Dietician Says Amazing Health Benefits Of Soaked Almonds And Chana For Body Strength And Strong Bones)

न्युट्रिशनिस्ट, डायटिशियन  शिखा अग्रवाल यांच्यामते बदाम आणि चण्यांमध्ये आयर्न, कॅल्शियम, प्रोटीनसहित इतर महत्वाची पोषक तत्व असतात. जी शरीराच्या चांगल्या कामकाजासाठी आवश्यक असतात. याच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. एनर्जी लेव्हल वाढते.

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

रेड क्लिफ लॅबच्या रिपोर्टनुसार भिजवलेल्या बदामात प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाणत जास्त असते ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि ताकद येते. बदामातील मोनोसॅच्युरेडेट फॅटी एसिड्स हार्ट डिसिजचा धोका टाळतात (Ref). बदामात व्हिटामीन ई आणि एंटी ऑक्सिडेंस असतात. बदामात फायबर्स असतात, ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी करण्यास मदत होते. कॅल्शियम पॉव्हरहाऊस असलेल्या बदामात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.  हाडं मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. 

भिजवलेले चणे खाण्याचे फायदे

भिजवलेले चणे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. चण्यांमध्ये फायबर्स असतात. त्यामुळे गॅसची समस्या कमी होते. चण्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे डायबिटीस रुग्णांसाठी हा चांगला पर्याय आहे.  हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम गरजेचे असते ते चण्यांमधून मिळते. चण्यात पोटॅशियम असते ज्यामुले ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. 

कॅल्शियम पाहिजे पण दूध नको? डॉक्टर सांगतात रोज खा १ चमचा पांढरे तीळ, हाडांना येईल बळकटी

बदाम आणि भिजवलेले चणे एकत्र खाण्याचे फायदे

दोघांमध्ये प्रोटीन, फायबर्स, व्हिटामीन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात अससतात. ज्यामुळे संपूर्ण शरीराला पोषण मिळते. या दोन्हींमुळे शरीरात दीर्घकाळ उर्जा आणि ताकद टिकून राहते. फायबर्स भरपूर असल्यामुळे बदाम आणि चणे वजन कमी करण्यास मदत करतात. या दोन्हींच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते.

कितीही वरण भात खा, कणभरही वजन वाढणार नाही; आहारतज्ज्ञ सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत

बदाम आणि चण्यांचे सेवन कसे करावे?

रात्री झोपण्याच्याआधी बदाम आणि चण्यांचे पाणी भिजवून ठेवा. सकाळी उठवून सालं काढून रिकाम्यापोटी याचे सेवन करा. तुम्ही दही, सॅलडे किंवा इतर पदार्थांसोबत हे खाऊ  शकतात. जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. 

Web Title: Dietician Says Amazing Health Benefits Of Soaked Almonds And Chana For Body Strength And Strong Bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.