Join us   

पाठ-कंबर खूप दुखते, थकवा येतो? रोज या ४ पैकी एका भाजीचा ज्यूस प्या, अशक्तपणा होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 7:15 PM

Dietician Suggest Eat These 4 Calcium Protine Rich Vegetable : हिरव्या पालेभाज्यांमध्ये महत्वाची पोषक तत्व असतात. यात व्हिटामीन्स, मिनरल्स, एंटीऑक्सिडेटंस आणि फायबर्स असतात.

तिशीनंतर सगळेचजण नोकरी, घर, कुटुंब आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांनी घेरलेले असतात.  या जबाबदाऱ्यांबरोबरच स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. या वयातच स्वत:च्या शरीराची सिस्टीम बिघडणं सुरू होतं. वयाच्या तिशीनंतर जेनेटिक फॅक्टर, लाईफस्टाईलमधील बदल, वाढतं वय,  कॅन्सर, पचनतंत्राशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत. त्वचेचे विकार जसं की केस गळणं या समस्यांचा धोका वाढतो. (Dietician Suggest Eat These 4 Calcium Protine And Iron Rich Vegetable After Of 30 To Strong Body)

न्युट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल यांच्यामते ३० वर्ष वयात मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणं महत्वाचे आहे. या वयात लोक खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. या वयात तुम्ही आपल्या डाएटमध्ये खाली दिलेल्या भाज्यांचा समावेश करायला हवा. 

जलकुंभी

जलकुंभी ही पालेभाजी आहे ज्यात व्हिटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्नसुद्धा असते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. याच्या सेवनाने कॅन्सरशी लढण्यास मदत होते. हृदयाचे विकार उद्भवत नाहीत. पचनक्रिया चांगली राहते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते, शरीराला ताकद येते आणि हाडं मजबूत होतात.

चायनिझ कोबी

या भाजीत  अनेक प्रकारचे व्हिटामीन्, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी उत्तम ठरतात. या भाजीत कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉलेट असते. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीराला फ्रि रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळता येते. ज्यामुळे कॅन्सरचा धोका टाळता येतो. पचनक्रिया चांगली राहते. वजन कमी करणं बीपी कंट्रोल करणं, हाडं मजबूत ठेवणं, इम्यूनिटी चांगली ठेवणं  आणि आजारांशी लढण्यापासून मदत होते. 

बीटाची पानं

बीटाच्या पानांमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. नियमित याचे सेवन केल्याने हाडं चांगली राहतात. ऑस्टिओपॅरोसिसचा धोका टाळता येतो. इम्यून सिस्टिम चांगली राहते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पचनक्रिया सुधारता येते. पाईल्स होत नाही, शरीरात रक्तपुरवढा चांगला राहतो. 

पालक

हिरव्या पालेभाज्यांमध्ये महत्वाची पोषक तत्व असतात. यात व्हिटामीन्स, मिनरल्स, एंटीऑक्सिडेटंस आणि फायबर्स असतात. ज्यामुळे इम्यून पॉवर वाढते, हाडं मजबूत होतात. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. कॅन्सर, डायबिटीस, यांसारख्या आजारांचा धोका टळतो. याव्यतिरिक्त लेट्यूस लीफ, कोलार्ड ग्रीन, यांचे सेवन करायला हवे.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल