Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीर लुकडंसुकडं-खाल्लेलं अंगाला लागत नाही? रात्री भिजवून सकाळी ५ पदार्थ खा, ताकद-वजन वाढेल

शरीर लुकडंसुकडं-खाल्लेलं अंगाला लागत नाही? रात्री भिजवून सकाळी ५ पदार्थ खा, ताकद-वजन वाढेल

Foods For Weight Gain : शेंगदाणे भिजवल्याने त्याचे पोषक मुल्य अधिक वाढते.  रोजच्या नाश्त्याला शेंगदाणे खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:37 AM2024-07-17T11:37:04+5:302024-07-17T17:52:17+5:30

Foods For Weight Gain : शेंगदाणे भिजवल्याने त्याचे पोषक मुल्य अधिक वाढते.  रोजच्या नाश्त्याला शेंगदाणे खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.

Dietitian Suggest Soaked 10 Foods Before Eat To Get Extra Calcium Iron And Protine Beat Weakness | शरीर लुकडंसुकडं-खाल्लेलं अंगाला लागत नाही? रात्री भिजवून सकाळी ५ पदार्थ खा, ताकद-वजन वाढेल

शरीर लुकडंसुकडं-खाल्लेलं अंगाला लागत नाही? रात्री भिजवून सकाळी ५ पदार्थ खा, ताकद-वजन वाढेल

खाल्लेलं व्यवस्थित अंगाला लागत नाही, वजन वाढत नाही अशी तक्रार अनेकांना उद्भवते. वजन वाढवण्यासाठी आहारात बदल करणं  ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. (Weight Gain Tips) काही खादयपदार्थ असे असतात जे पाण्यात भिजवल्याने फक्त शिजवण्याचा वेळ कमी होत नाही तर पचनातही सुधारणा होते. (Foods For Weight Gain) यातून काही असे तत्व बाहेर येतात ज्यामुळे त्याचे पोषण मुल्य वाढते. सकाळी उठल्यानंतर रात्री भिजवलेले काही पदार्थ खाल्ल्याने अंगाला लागतात आणि शरीर दिवसभर एनर्जेटीक राहते. (Dietitian Suggest Soaked 10 Foods Before Eat To Get Extra Calcium Iron And Protine Beat Weakness)

बदाम

भिजवलेले पदार्थ पचायला हलके असतात. ज्यामुळे पोषक तत्वांचे अवशोषण वाढते. तांदूळ भिजवल्याने ते शिजण्याचा वेळ कमी होतो आणि अन्नातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जाते. मधल्यावेळेत भूक लागल्यानंतरही तुम्ही बदाम खाऊ शकतात. ज्यामुळे शरीराला ताकद येते.

चिया सिड्स आणि ओट्स

चिया सिड्स आणि ओट्स खाल्ल्याने बराचवेळ तुम्हाला भूक लागणार नाही. भिजवलेले ओट्स खाल्ल्याने यातील स्टार्च टुटतात आणि पचायला सोपे होते.  ज्यामुळे ब्लड शुगर कमी होते. 

सोयाबीन आणि शिंगाडा

सोयाबीन आणि शिंगाडा प्रोटीन आणि फायबर्स, स्टार्चचा एक चांगला स्त्रोत आबे. भिजवल्यानंतर याचा कडवटपणा कमी होतो. पचायलाही हलका असतो. सोयाबीन रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्याने त्यातील फायटीक एसिड कमी होते आणि पचायला सोपं होतं. 

मनुके

मनुके रात्रभर भिजवून ठेवा. त्यातून अधिकाधिक पोषण तत्व मिळतात. मनुके वाढवण्यासाठी करण्यासाठीही उत्तम आहेत. सकाळी उठल्यानंतर मनुक्यांचे सेवन करा. ज्यामुळे शरीर निरोगी राहील.

एकादशीला करा उपवासाचे मेदूवडे, १ वाटी भगरीचे २० कुरकुरीत खमंग वडे-पचायलाही हलके

डाळी

मसूर डाळ, छोले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.  सकाळी उठून या धान्यांचे सेवन करा. यात फायटीक एसिड निघून जाण्यास मदत होते.  

एकादशीचा उपवास कसा सोडावा? काय खावे काय खाऊ नये, पाहा-तब्येतीला त्रास होणार नाही

शेंगदाणे

शेंगदाणे भिजवल्याने त्याचे पोषक मुल्य अधिक वाढते.  रोजच्या नाश्त्याला शेंगदाणे खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत. याशिवाय  वजन वाढण्यासही मदत होते. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन असल्याने याच्या सेवनाने मसल्स चांगले राहतात आणि पोषक तत्वांची कमतरता भासत नाही.

Web Title: Dietitian Suggest Soaked 10 Foods Before Eat To Get Extra Calcium Iron And Protine Beat Weakness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.