सध्या तेलकट पदार्थ खाण्याचे लोकं शौकीन झाले आहेत. कोणतेही फंक्शन, पार्टी, अथवा सोहळा असो तेलकट - चमचमीत पदार्थांचे डिश त्याठिकाणी पाहायला मिळतात. तेलकट पदार्थ अतिप्रमाणावर खाल्ल्यामुळे पोटाच्या निगडीत समस्या उद्भवते. पोटात गॅस तयार होतो. पोट फुगून आंबट ढेकर येऊ लागतात. अशाने आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. अनेक वेळा लोक जेवणाच्या हव्यासापोटी जास्त तेलकट पदार्थांचे सेवन करतात. परंतु असे वारंवार केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.
जास्त तेलकट अन्न खाल्ल्याने गॅस, अपचन, पोट आणि छातीत जळजळ, तसेच हृदय आणि यकृताला नुकसान पोहचते. तेलकट पदार्थांमध्ये कॅलरीज आणि सॅच्युरेटेड फॅट्स अधिक प्रमाणावर असते. ज्यामुळे लठ्ठपणा, कोलेस्टेरॉलची पातळी, मधुमेह टाइप 2, हृदयरोग, उच्च रक्तदाब अशा समस्या उद्भवतात. या समस्येपासून वाचण्यासाठी वेळीच काळजी घेणं महत्वाचं.
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काय करावे
कोमट पाणी प्या
अनेकवेळा लोकं खाण्याच्या मोहापोटी तेलकट पदार्थ अधिक प्रमाणावर खातात. जर आपण तेलकट पदार्थ अधिक प्रमाणावर खात असाल तर, अपचन, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे, गॅस इत्यादी समस्या निर्माण होतात. यासाठी तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्या. कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सक्रीय होते. पोटाला थंडावा मिळतो. पुरेसे पाणी प्यायले नाही तर लहान आतडे अन्न नीट पचवू शकत नाही. अनेक वेळा जास्त तेलकट आणि जंक फूड खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. कोमट पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होईल.
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर फेरफटका मारा
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर थोडा वेळ शतपावली करा. तेलकट पदार्थ अधिक प्रमाणावर खाल्ल्याने पोटाच्या निगडीत समस्या उद्भवतात. मात्र, अन्न खाल्ल्यानंतर १५ ते २० मिनिटे तरी चाला. चालण्याने पचनशक्ती सुधारते. यासह पोटाला देखील आराम मिळतो.
प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ खा
प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया तयार होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. प्रोबायोटिक्सयुक्त दह्याचे दररोज सेवन करा. तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्रास होत असेल तर एक वाटी दही खा. आराम मिळेल.