बोलताना सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की, हे एवढे दिवसभर कष्ट आपण कशासाठी उपसतो? दोन वेळेच्या जेवणासाठीच ना! पण हे वाक्य फक्त बोलण्यापुरतंच राहातं. दिवसभराच्या कामात दोन वेळच्या जेवणाला महत्त्वच नाही. वेळ मिळेल तसं, जे मिळेल ते खाऊन जेवण साजरं करायचं असं अनेकजण करतात. परिणामी अँसिडिटी, पचनाचे विकार होतात.
आपली जीवनशैली, कामाची पध्दत आणि पचन यांचा जवळचा संबंध असतो. यात जर दोष असले तर परिणाम पचनावरच होतो. पचन नीट झालं नाही तर त्याचा दिवसभराच्या कामावर परिणाम होतो. आपली पचन क्रिया ताळ्यावर आणण्यासाठी जेवणानंतर काय करायला हवं हे समजून घेणं आवश्यक आहे. खूप सोप्या गोष्टी आहेत. पण त्या माहिती आहेत म्हणून किंवा वेळच नाहीये म्हणून केल्या जात नाही.
जेवण झाल्यानंतर
छायाचित्र- गुगल
1. जेवण झाल्यानंतर काय करावं याच्या पूर्वी एक गोष्ट आवर्जून करु नये हे सांगणं आवश्यक आहे. अनेकांनी दुपारी जेवल्यानंतर झोपण्याची सवय असते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ही सवय अंगात वात , पित्त आणि कफदोष निर्माण करते. झोपल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचा प्रवास उलटया दिशेने होतो. त्यामुळे घसा, छाती जळजळणे , पोट फुगणे, अन्न न पचणे असे त्रास होतात. तसेच अनेकांचं रात्रीचं जेवण उशिरा होतं. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपलं जातं. पचनाच्या दृष्टिकोनातून विचार करता रात्रीचं जेवण आणि झोप यात किमान दोन तासंचं अंतर असणं गरजेचं असतं. हे अंतर राखलं तर पचन व्यवस्थित होतं आणि झोपही शांत लागते.
छायाचित्र- गुगल
2. जेवल्यानंतर लगेच बडिशेप खावी. यामुळे तोंडास सुखद आणि ताजातवाना गंध येतो. बडिशेपही पचनासाठी अतिशय उपयुक्त असते. बडिशेप चावून खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. विषारी घटक बाहेर पडल्याने पचनक्रियाही सुधारते.
छायाचित्र- गुगल
3. जेवल्यानंतर पोटाचा हलक्या हातानं मसाज करावा. यामुळे पोटातील स्नायुंना आराम मिळतो. हे स्नायू मग पचन क्रिया व्यवस्थित होण्यास मदत करतात. पोटाचा मसाज केल्यानं बध्दकोष्ठता होत नाही. एका अभ्यासानुसार महिलांनी जेवणानंतर पोटाचा मसाज केल्याने मासिक पाळीतल्या वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच जेवणानंतर पोटाच्या मसाजने पोटाचे स्नायू मजबूत होतात.
छायाचित्र- गुगल
4. जेवणात जर गोड, मसालेदार, तळलेले पदार्थ , पुरी, पराठे खाल्ले तर ते पचण्यास जड जातात. पचण्यास सुलभता यावी म्हणून जेवणानंतर एक ग्लास लिंबू पाणी प्यावं. यामुळे जेवल्यानंतर पोट फुगण्याचा त्रासही होत नाही. लिंबू पाणी पिल्यामुळे पचन क्रियेला गते मिळते.
छायाचित्र- गुगल
5. चालणे ही आरोग्यदायी क्रिया आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळेला चाललं तर त्याचे आरोग्यास लाभच होतात. जेवणानंतर चालायाला गेल्यानं त्याचा परिणाम पचन सुलभ होण्यावर होतो. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करु नये हा नियम आहे. पण खूप जोरात आणि खूप ह्ळू न चालता एका सामान्य वेगानं चालण्यानं जेवण लवकर पचतं. जेवणानंतर अनेकांना अस्वस्थ होतं. बसणंही अवघड होतं. जेवल्यानंतर 15 ते 20 मिनिटं चालल्याने पचनासंबंधीचे विकार दूर होतात.