दिवाळीत फटाक्यांचा आनंद घेताना फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी. याबबत फारशी जागरूकता लोकांमध्ये नसते. परिणामी फटाक्यांमुळे होत असलेल्या दुखापतींची संख्या वाढत चालली आहे. सण साजरा करण्यासाठी जगभरातील लोक फटाक्यांचा वापर करतात. भारतात प्रामुख्यानं दिवाळीत फटाके जास्त वापरले जातात. पण योग्य मार्गदर्शनाखाली फटाक्यांचा वापर केला नाही तर दुखापत होण्याचा धोका वाढतो. (How to Firecrackers affects our Health)
या डोळ्यांच्या दुखापतीमुळे गंभीर आणि भरून न निघणारे नुकसान होऊ शकते. दिवाळीत रुग्णालयातील दुखापतग्रस्त रुग्णांमध्ये फटाक्यांमुळे झालेल्या दुखापतींची संख्या वाढलेली दिसते. फटाक्यांचा आनंद घेताना डोळ्यांवर सुरक्षात्मक कवचाचा वपर करण्याबाबत आणि संरक्षणाबाबत उदासिनता असल्यानं दुखापतींची संख्या वाढते. दिवाळीत अशा प्रकारच्या अपघाताता लहान मुलं दुखपतग्रस्त झालेली दिसतात. बेजबाबदार नागरिकांच्या निगराणीखाली फटाक्यांचा आनंद घेणारी मुलं मोठ्या प्रमाणावर अपघातग्रस्त होतात.
फटाक्यांमुळे पापण्या आणि डोळ्यांच्या बाहुलीला कमिकल तसंच थर्मल बर्न होतं. त्यामुळे डोळ्यांच्या पटलाला इजा पोहोचते. परिणामी कायमचा आंधळेपणा येऊ शकतो. अनेकदा डोळ्यावर येत असलेल्या प्रकाशामुळे ग्लोब परफोरेशन आणि इंट्रा ऑक्यूलर फॉरेन बॉडीजची तक्रार उद्भवते. यामुळे दृष्टी गमवावी लागू शकते असे प्रा. डॉ. एस नटराजन यांनी स्पष्ट केले.
“वास्तविक फटाके हे मोकळ्या मैदानात, घरापासून दूर, सुका पालापाचोळा अथवा गवत किंवा ज्वलनशील पदार्थांपासून दूर लावावेत. एखादप्रसंगी फटाक्याचा स्फोट झाल्यास किंवा त्याला आग धरल्यास, अनपेक्षित घटनेकरीता सोबत पाण्याने भरलेली बादली बाळगावी. फटाके कधीही बंद डब्यात, प्रामुख्याने काच अथवा धातूच्या भांड्यात पेटवू नयेत. खराब असलेले फटाके जाळण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न करू नये.
पाण्यात भिजवून सुरक्षित पद्धतीन नष्ट करावे. फटाक्यांची आतषबाजी पाहायला आलेल्यांनाही धोका असल्यानं फटाक्यांची मजा ५०० फूट दुरून घ्यावी. तसंच सुरक्षात्म सुचनांचं पालन करावे. असंही प्रा डॉ, एस नटराजन. डॉ. अगरवाल ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल मुंबई यांनी सांगितले.
फटाके प्रकाशाची आतषबाजी करतात म्हणजे रॉकेट आणि बॉम्ब यांसारखे प्रोजेक्टाईल फायरवर्क्स अनेकदा दुखापतीसाठी जबाबदार असतात. हे फटाके शक्यतो टाळावेत. धोकादायक वाटणारे प्रकाशाची उधळणं करणारे फटाके १०९३ अंश सेल्सिअसहून अधिक जळतात. त्यामुळे फटाक्यांमुळे होणारे अपघात वाढत जातात. अनेकदा गंभीर दुखापतीमुळे मृत्यूचा धोकाही ओढावतो.
फटाक्यांमुळे इजा झाल्यास हे करावे आणि हे करू नये:
१) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही आय ड्रॉप वापरू नयेत.
२) डोळे स्वच्छ पाणी धुवून घ्या
३) डोळे चोळू नका
४) त्यांच्यावर ताण येईल असे काहीही करू नका