Join us   

दुपारी जेवणानंतर वामकुक्षीच्या नावाखाली ढाराढूर झोपण्याचे 3 तोटे.. मात्र झोपण्यापेक्षा डुलकी फायद्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 5:11 PM

दुपारी झोपल्यानं ( sleeping in daytime) रात्रीची झोप तर विस्कळीत होतेच सोबतच आरोग्यास इतरही आजारांचा धोका (disadvantages of sleeping in daytime) निर्माण होतो. तज्ज्ञ म्हणतात दुपारी झोपण्यापेक्षा छोटी डुलकी (benefits of power nap) घेणं फायद्याचं!

ठळक मुद्दे दुपारी झोपल्यानं रात्रीची झोप विस्कळीत होते.हार्मोन्स असंतुलन निर्माण होण्यास दुपारची झोप कारणीभूत ठरते. दुपारी झोपल्यानं पचनक्रियेवर, चयापचय क्रियेवर वाईट परिणाम होतात. 

दुपारी जेवल्यानंतर डोळ्यावर झोप येतेच. थोडा आराम करावा म्हणून पाठ टेकवली तर पुढे तास न तास  झोपलं (sleeping in daytime)  जातं. पण दुपारच्या अशा झोपेनं फायदा होण्याऐवजी तोटेच होतात. दुपारी झोपल्यानं रात्रीची झोप तर विस्कळीत होतेच सोबतच आरोग्यास इतरही आजारांचा धोका निर्माण (disadvantages of sleeping in daytime)  होतो. दुपारी झोपणं का वाईट आहे? दुपारी झोपायचंच असेल तर किती झोपावं ( power nap)  याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात हे समजून घेतल्यास दुपारच्या झोपेमुळे होणारे धोके नक्कीच टाळता येतील. 

Image: Google

दुपारी झोपल्यानं काय होतं?

1. रात्री शांत आणि पुरेशी झोप घेणं याचा संबंध हार्मोनच्या निर्मितीशी आणि हार्मोन्सच्या स्ंतुलनाशी असतो. पण दुपारी झोप घेतल्यानं रात्रीची झोप विस्कळीत होते. लवकर झोप लागत नाही, शांत झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना झोप झाल्यासारखी वाटत नाही. या परिणामांमुळे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं. दिवसभर मूड खराब राहातो. तसेच दुपारच्या झोपण्यानं मनाला उदासी येते. नैराश्याचा आजारही उद्भवू शकण्याचा धोका असतो. 

2. दुपारी झोपल्यानं पचनास मदत करणाऱ्या विकरांवर परिणाम होतो. यामुळे अन्न नीट पचत नाही. दुपारी झोपल्यानं पोट फुगल्यासारखं वाटतं. काही न खाता पिताही शरीराला जडपणा आल्यासारखा वाटतो. दुपारच्या झोपमुळे मधे मधे खाण्याचा मोह होतो. आणि मधे मध्ये सतत खाल्ल्यानं इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. दुपारी झोपल्यानं वजन वाढतं. दुपारी तासनतास झोपल्यानं पचनावर तर परिणाम होतोच पण सोबतच चयापचयाची क्रियाही बिघडते. यामुळे वजन वाढतं. 

3.  शरीरावर सूज निर्माण होण्यास दुपारची झोप कारणीभूत ठरते. रोज दुपारी तासनतास झोपणं आणि रात्री उशिरा झोपणं, रात्रीची झोप पुरेशी न घेणं यामुळे शरीरावरील सूज वाढते. ही सूज इतर आरोग्यविषयक समस्यांना कारणीभूत ठरते. 

Image: Google

झोपण्यापेक्षा डुलकी फायद्याची

दुपारी जेवणानंतर तासनतास झोपण्याऐवजी 10 ते 20 मिनिटांची छोटी डुलकी घेणं फायद्याचं असतं. यामुळे सजगता वाढते. ताजंतवानं वाटतं. दुपारी अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपू नये. दुपारी 3 वाजेनंतर झोपल्यास रात्रीची झोप विस्कळीत होते, त्यामुळे दुपारी 3 नंतर झोपणं टाळावं. झोपण्यापेक्षा 10 ते 20 मिनिटांची डुलकी घेतल्यास शरीर आणि मनाला आराम मिळतो. छोटीशी डुलकी घेतल्यानं रक्तदाब वाढत नाही, थकवा येत नाही. मेंदूचं कार्य उत्तम चालतं. सजगता वाढते. क्रिया प्रतिक्रियांचा वेग वाढतो. झोपण्याऐवजी दुपारी छोटी डुलकी घेतल्यानं काम करण्याची ताकद आणि उत्साह वाढतो तसेच मूडही सुधारतो. पचन क्रियेला, मेंदुला आराम मिळतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स