लिव्हर कॅन्सर (Liver Cancer) हा असा आजार आहे जो लिव्हरच्या पेशींपासून सुरू होतो. आपल्या शरीरात लिव्हर एक फुटबॉलच्या आकाराचे अंग आहे. जे पोटाच्या वरच्या डाव्या भागात डायफ्रामच्या खालच्या आणि पोटाच्या वरच्या भागात होतो. लिव्हरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होते. लिव्हर कॅन्सरचा सगळ्यात सामान्य प्रकार हेपेटोसेलुलर कार्सिनोमा आहे. जो मुख्य प्रकार लिव्हरच्या पेशींपासून सुरू होते. (Diseases Conditions These 5 Symptoms Appers in The Body in Early Stage Of Liver Cancer)
अन्य प्रकारचे लिव्हर कॅन्सर जसं की इंट्राहेपेटिक कोलेंजिओकार्सिनोमा आणि हेपेटोब्लास्टोमा अनेक लोकांमध्ये उद्भवतो. शरीरात वेगवेगळे बदल दिसून येतात. ज्याकडे लक्ष देऊन तुम्ही उपाय करू शकता. लिव्हर कॅन्सर झाल्यास रुग्णाचे वजन वेगानं कमी होऊ लागते. मुख्य स्वरूपात या कॅन्सरमुळे वजन कमी होत असेल तर दुर्लक्ष करू नका. अशा स्थितीत तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा जेणेकरून वेळेवर उपाय करता येतील.
वजन वेगाने कमी होणं
लिव्हर कॅन्सर झाल्याच्या स्थितीत रुग्णाचे वजन वेगाने कमी होते. कोणतंही कारण नसताना हे वजन कमी होते. याकडे दुर्लक्ष करू नका. अशा स्थितीत त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतील. अशा स्थितीत तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता असते.
भूक कमी लागणं
भूक कमी लागणं या स्थितीला तुम्ही सामान्य समजत असाल पण हे लक्षण दीर्घकाळ दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही एक गंभीर स्थिती असू शकते. भूक न लागणं लिव्हर कॅन्सरचे संकेत देते. अशा स्थितीत रुग्णाला योग्य उपचारांची आवश्यकता असते. जेणे करून गंभीर स्थितीपासून बचाव होईल.
पोटाच्या वरच्या भागात वेदना
लिव्हर कॅन्सर झाल्यास रुग्णाच्या पोटाच्या वरच्या भागात वेदना होतात जर तुम्हाला शरीरात ही लक्षणं दिसत असतील हेल्थ एक्सपर्टची मदत घ्या. जेणेकरून तुम्हाला वेळेवर उपाय करता येतील.
उलट्या होणं
मळमळ किंवा उलट्या होणं हे देखील लिव्हर कॅन्सरचं लक्षण असू शकते. कोणत्याही कारणाशिवाय उलटी किंवा मळमळ होत असेल तर त्वरीत हेल्थ एक्सपर्ट्शी संपर्क साधा अशा स्थिती गंभीर आजार होण्यापासून टाळता येतं.
पोटाची सूज
पोटाच्या आजूबाजूला सूज येणं किंवा गाठीसारखं वाटतं लिव्हर कॅन्सरचं लक्षण असू शकते. यास्थितीकडे दुर्लक्ष करू नका. अशा स्थितीत तुम्हाल डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता असते जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतील.