Join us   

पायांवर नेहमी सूज-पायात गोळे येतात? शरीर सांगतं तुम्ही आजारी आहात कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 1:42 PM

Diseases Signs On Feet : आपलं स्वत:कडे लक्ष असतं का?

आपलं आपल्या शरीराकडे लक्ष असलं तर अनेक बारीकसारीक बदल आपल्याला आरोग्याच्या तक्रारी सांगतात. काही आजारांची लक्षणं वेळेत दिसतात. शरीर कुरकुरत असतं पण आपलं लक्ष नसतं. किंवा वरवर मलमपट्टी करुन आपण कामं करतो. धकवून नेतो. महिला तर यात उस्ताद. होता होईतो दवाखान्यात जात नाहीत. आजार अंगावर काढतात. आणि मग घोळ असा होतो की आजार विकोपाला गेला की डॉक्टर गाठला जातो. पण अनेकदा आपली त्वचा, आपले केस, पाय, पायावरची सूज, तुटणारी नखं, पित्त, डोकेदुखी हे आजार की आजाराची लक्षणं हेच अनेकदा कळत नाही. त्यासाठी वेळेत डॉक्टरांकडे जायला हवं.  

1) पायांवर सूज

डॉ. स्मिता भोईल पाटील यांचा एक व्हिडिओही यासंदर्भात माहिती देतो. जर पायांवर सतत सूज येत असेल, पाय फुगल्यासारखे वाटत असतील तर तुम्हाला हायपरटेंशन, किडनीची समस्या, लिव्हरची समस्या, हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून वेळीच चाचण्या करून घ्या. 

2) स्पाइडर वेन्स

पायांमध्ये जाळ्याप्रमाणे खुणा दिसतात त्याला स्पाइडर वेन्स असे म्हणतात. हाय इस्ट्रोजन लेव्हल, बर्थ कंट्रोल पिल्स किंवा गर्भावस्थेमुळे असे होऊ शकते.  डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

3) टाचांना भेगा 

टाचांना भेगा पडणं म्हणजे व्हिटामीन बी-12 व्हिटामीन बी-3, यांची कमतरता असू शकते.   ओमेगा-3 ची कमतरता भासते. व्हिटामीन्स, ओमेगा-3 फॅटी एसिड्सची यांचा आहारात समावेश करा. यामुळे त्वचेलाही फायदे मिळतात. 

4) पायाला मुंग्या येणं

अचानक पायांमध्ये झिणझिण्या येणं, पाय सुन्न पडणं व्हिटामीन बी12 कमतरतेची लक्षणं आहेत. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करा.  व्हिटामीन बी-12 सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता.  हिरव्या भाज्या, फळं, दूध, दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश  करा.

पाय बारीक मांड्या खूप जाड? डॉक्टर सांगतात रोज 'इतका वेळ' चाला, स्लिम दिसतील मांड्या

5) पाय थंड पडणं

आयोडीनच्या कमतरतेमुळे पाय थंड पडतात. एनिमियामुळे अशी स्थिती उद्भवू शकते. योग्य प्रमाणात आयोडीनचे सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.

९९ टक्के लोक चुकीच्या पद्धतीनं डाळ खातात ; योग्य पद्धत पाहा, अंगावर मांस चढेल-फिट दिसाल

पायात गोळे

पायांच्या मसल्समध्ये  वेदना होणं, खेचल्यासारखं वाटणं, मॅग्नेशियमची कमतरतेचे संकेत असू शकतात. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात मॅग्नेशियम युक्त पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे क्रॅम्प्स कमी होतात. या पदार्थांचा आहारात समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइल