दिवाळीचा सण आजपासून सुरू झाला असून सर्वजण आपल्या कुटुंबासोबत दिवाळीमधील भाऊबीज (Bhaubeej),लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशी (Dhanteras) हे सण साजरे करतात. दिवाळीला आपण सगळेचजण पुजेची, चांदीची वापरण्यासाठी वर काढतो. या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी अनेकींना आपले तासनतास घालवावे लागतात.
भांडी चकचकीत करण्यासाठी तुम्ही पिंताबरी, डिर्टंजंट, सोप असे वेगवेगळे पर्याय वापरतच असाल. आज आम्ही तुम्हाला चांदीची भांडी स्वच्छ करण्याच्या काही सोप्य ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही कमीत कमी वेळात भांडी चमकवू शकता. (Silver utensils cleaning tips and hacks)
1) टूथपेस्टचा वापर (Toothpaste)
टूथपेस्ट आपल्या घरी नेहमीच असते. याचा वापर करून तुम्ही चांदीची भांडी चमकवू शकता. सगळ्यात आधी टूथपेस्टमध्ये मीठ घालून एकत्र करा. हे मिश्रम चांदीच्या भांड्याला लावा. १० मिनिटांनी स्वच्छ कापडानं पुसून टाका. या उपायानं चांदीच्या भांड्यावरचे लवकर निघून जातील.
२) लिंबाचा रस (Lemon)
लिंबात सिट्रिक अॅसिडचे असते. त्यामुळे कोणताही धातू त्याने स्वच्छ होऊ शकतो. लिंबाच्या रसात घ्या त्यामध्ये बेकिंग सोडा एकत्र करा. ब्रश किंवा कापसाच्या बोळ्यानं हे मिश्रण भांड्यांना लावा. तसेच तुम्ही चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी अॅल्यूमिनियम फॉयलही वापरू शकता.
३) बेकिंग सोडा (Baking soda)
बेकिंग सोडा आणि लिंबू दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. पण भांडी साफ करण्यासाठी दोन्ही एकत्र मिसळा. आता या मिश्रणात एक जुना टूथब्रश बुडवून भांड्यावर घासून घ्या आणि नंतर सुती कापडाने स्वच्छ करा. जर डाग पूर्णपणे निघाले नाही तर ही प्रक्रिया पुन्हा करा.
४) व्हिनेगर (Vinegar)
एका लहान भांड्यात एक चमचा मैदा, एक चमचा मीठ आणि एक चमचा व्हिनेगर घालून पेस्ट बनवा. त्याचा पातळ थर आपल्या भांड्यांना लावा आणि १५ ते २० मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा आणि सुकवा.