दिवाळी म्हणजे रोषणाई आणि फराळ (Diwali Faral). दिवाळी या सणानिमित्त फराळ आवर्जुन केला जातो (Indigestion). डाएट वगैरे बाजूला ठेवून आपण फराळ आणि मिठाई खातो. जिभेची चोचले आपण मनसोक्त पूर्ण करतो. पण ज्यांना पोटाचा त्रास आहे, त्यांनी मर्यादित प्रमाणात मिठाई आणि फराळ खावा. अनेकदा कमी प्रमाणात फराळ खाल्ला तरी, पोटाचा त्रास छळतो.
अशावेळी हेल्दी पदार्थ खाऊनही ते व्यवस्थित पचत नाही. मुख्य म्हणजे मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रिकची समस्या निर्माण होते. यामुळे खराब पचन, आम्लपित्त, गॅस, बद्धकोष्ठता, पोट आणि छातीत जळजळ, उलट्या आणि जुलाब इत्यादी स्मास्या छळतात. दिवाळीत चमचमीत पदार्थ आणि मिठाई खाऊन पोटाचा त्रास होऊ नये म्हणून ३ गोष्टी करा. जिभेचे चोचले पूर्ण करा. पोटाचा त्रास होणारच नाही(Diwali 2024 : Home Remedies for Indigestion).
दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन
यासंदर्भात, डॉक्टर शिवानी देसवाल सांगतात, 'दिवाळीच्या काळात मिठाईची मोठ्या प्रमाणात विक्री होते. बऱ्याच मिठाईमध्ये भेसळही केली जाते. भेसळ केलेली मोठी खाल्ल्याने पोटाचे विकार वाढतात. ज्यामुळे पचनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.'
पोटाचा त्रास छळू नये म्हणून टिप्स
भरपूर पाणी प्या
दिवाळीनिमित्त भरपूर गोड खाल्लं तर, शरीर डिटॉक्स करणं गरजेचं आहे. डॉक्टर शिवानी देसवाल यांच्या मते, दिवसभरात किमान ८ - १० ग्लास पाणी प्यावे. नुसतं पाणी पिण्यापेक्षा आपण त्यात लिंबाचा रस, संत्र्याचा रस, ताक किंवा जलजीरा घालून पिऊ शकता. हे पेय शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासोबतच पचनक्रिया सुधारते.
संतुलित आहार घ्या
दिवाळीनंतर किमान आठवडा ते दहा दिवस आपला आहार निरोगी आणि संतुलित ठेवा. आहारात अशा पदार्थांचा समावेश करा, ज्यामध्ये पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात असतील. शिवाय जे सहज पचतील. फ्राईड किंवा जास्त साखर असलेले पदार्थ कमी प्रमाणात खावे.
व्यायाम करा
मिठाई आणि फ्राईड पदार्थ खाल्ल्यानंतर व्यायाम करणे गरजेचं आहे. शिवाय हलके पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या. यामुळे पचनक्रियेत अडथळे येणार नाही.
दिवाळीची इतकी साफसफाई केली तरी घरात झुरळं दिसतातच? पाण्यात ३ गोष्टी घालून लादी पुसा
डॉक्टरांशी संपर्क साधा
जर हे उपाय करूनही पोटाशी संबंधित समस्या सुटत नसतील तर, डॉक्टरांशी संपर्क साधावा. शिवाय जीवनशैलीत काही बदल करून पाहा.