दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. घरोघरी साफसफाई, फराळाची लगबग सुरू आहे. कमीत कमी वेळात घराची साफसफाई (Diwali cleaning tips) करण्यासाठी काही टिप्स तुम्ही नक्की वापरू शकता. पितळेची भांडी आणि देवाच्या मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतात. पितळ हा एक धातू आहे जो खूप चकचकीत दिसतो, परंतु कालांतराने तो काळा देखील होतो. अनेकदा आपण घाईघाईने खराब झालेले पितळाची भांडी न स्वच्छ करता वापरतो, त्यांची पॉलिशिंग न पाहता विकत घेतो आणि मग ती भांडी सतत साफ करावी लागतात. (How to quickly clean pital utensil)
पितळेची भांडी काळी होत असतील तर ती चमकदार दिसण्यासाठी काही ट्रिक्स वापरल्यानं तुमचं काम सोपं होऊ शकतं. (how to clean pital murti at home) पितळाची भांडी, मूर्ती घेतानाही काळजी घेतली पाहिजे आणि जर ती काळी पडत असतील तर ती कशी चमकवायची?
सर्वप्रथम, आपण आपले पात्र पितळेचे आहे की नाही हे देखील तपासावे. पितळेचे पात्र ओळखण्यासाठी, भांड्यावर चुंबक लावण्याचा प्रयत्न करा, जर चुंबक चिकटत असेल तर तुमचे पात्र पितळेचे नसून धातूचे आहे. जर चुंबक चिकटत नसेल, तर तुमचे पितळ खरे आहे. तुम्ही गरम पाण्याने आणि साबणाने पितळेची भांडी धुवू शकता. अशा भांड्यांना पॉलिश करण्याची सुद्धा आवश्यकता नसते.
दिवाळीसाठी रेडीमेड ब्लाऊज घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; पाहा एकापेक्षा एक लेटेस्ट पॅटर्न
१) पितळाला पॉलिश करा
जर तुम्हाला पितळेच्या भांड्यावर काळपटपणा नको असेल तर ते नियमितपणे पॉलिश करा. हे लक्षात ठेवा की तुम्ही पितळेची भांडी विशेषतः पितळासाठी तयार केलेल्या पोलिशने पॉलिश करत आहात. पॉलिशिंग सुरू करण्यापूर्वी, नेहमी भांडी धुवून घ्या. यासाठी आपल्याला फक्त गरम पाणी आणि सौम्य डिश वॉश आवश्यक आहे. मऊ कापड पाण्यात बुडवून आणि नंतर पॉलिश करून भांडे स्वच्छ करा.
फक्त ५ मिनिटांत काळं पडलेलं स्विच बोर्ड होईल चकचकीत; 'या' घ्या बटन्स साफ सफाईच्या सोप्या टिप्स
२) ब्रास क्लिनरने पितळ साफ करा
पितळेची भांडी स्वच्छ आणि पॉलिश करण्यासाठी तुम्ही ब्रास क्लीनर वापरू शकता. ब्रास क्लीनर खूप प्रभावी आहेत. तुम्हाला भांड्यांवर क्लिनरचा थर लावावा लागेल आणि 15-20 मिनिटे सोडा आणि नंतर मऊ कापडाने पुसून टाका. तुमची भांडी एकदम नवीन आणि चमकदार दिसतील. तुम्हाला बाजारात आणि ऑनलाइन विविध ब्रास क्लिनरचे प्रकार मिळतील.
घरगुती उपाय
१) टूथपेस्ट
आपल्या घरातील पितळेच्या भांड्यांवर टूथपेस्ट लावा आणि कमीतकमी 1 तास सोडा, त्यानंतर कोमट पाण्याने आपली भांडी स्वच्छ करा. टूथपेस्ट तुमच्या ब्रासवेअरची चमक टिकवून ठेवण्यास मदत करेल.
२) व्हिनेगर
एका लहान भांड्यात एक चमचा मैदा, एक चमचा मीठ आणि एक चमचा व्हिनेगर घालून पेस्ट बनवा. त्याचा पातळ थर आपल्या भांडीमध्ये लावा आणि 45 मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा आणि सुकवा.
फक्त २ मिनिटात गंजलेलं, अस्वच्छ गॅस बर्नर होईल साफ; या घ्या बर्नर चकचकीत करण्याच्या सोप्या टिप्स
३) मीठ, बेकिंग सोडा
अर्ध्या लिंबाच्या रसात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि त्याची बारीक पेस्ट बनवा. मऊ कापडाने भांड्यांना पेस्ट लावा. जर डाग जास्त असतील तर पेस्ट 30-45 मिनिटं भांड्यांवर सोडा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा आणि कोरडे करा. आवश्यक असल्यास, आपण ही पेस्ट पुन्हा वापरू शकता.