Join us   

डोक्यावरुन आंघोळ केल्यावर थकल्यासारखं वाटतं, झोप येते? आंघोळ झाल्यावर न विसरता करा २ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 3:44 PM

Do 2 Things After Bath Head Wash : डोक्यावरुन आंघोळ केल्याने आपल्याला काहीसा थकवा येण्याची शक्यता असते.

आपण दिवसातून किमान ३ ते ४ वेळा तोंड धुतो, रोज १ किंवा २ वेळा आंघोळ करतो. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केस धुतो. आठवड्याच्या कामांपैकी हे एक महत्त्वाचे काम असते. प्रदूषण, सतत येणारा घाम, धूळ यांमुळे केस चिकट होतात. यामुळे केसांत कोंडा होणे, वास येणे, केसांचा पोत खराब होणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणून आपण कितीही बिझी शेड्यूल असले तरी वेळात वेळ काढून केस धुतोच. केस धुवायचे म्हणजे आंघोळीला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला इतर गोष्टींचे त्याप्रमाणे नियोजन करावे लागते. आपण साधारणपणे ऑफीसला जाताना किंवा घराबाहेर पडताना आंघोळ करतो. डोक्यावरुन आंघोळ केल्याने आपल्याला काहीसा थकवा येण्याची शक्यता असते. अशावेळी आंघोळ झाल्यानंतर २ गोष्टी आवर्जून करायला हव्यात. म्हणजे आंघोळीने आलेला थकवा दूर होतो आणि आपल्याला तरतरी येण्यास मदत होते (Do 2 Things After Bath Head Wash).

१. आपल्यापैकी बहुतांश जण कोमट पाण्याने आंघोळ करतात. कोमट पाण्याने आंघोळ केल्यावर शरीरातील रक्तप्रवाह काहीसा वेगाने होण्याची शक्यता असते. सामान्य आंघोळ केल्यावरही आपल्याला थोडे थकायला होते. त्यामुळे डोक्यावरुन आंघोळ केल्यावर तर आपण जास्तच थकतो. अशावेळी आंघोळ करुन बाहेर आल्यावर किमान ५ ते १० मिनीटे शांत बसावे. एकदम थकल्यासारखे वाटत असेल तर पाठ टेकून, डोळे मिटून बसावे म्हणजे रिलॅक्स वाटते. 

२. आंघोळीवरुन आल्यावर न विसरता ग्लासभर पाणी प्या. त्यामुळे थकवा निघून जाण्यास मदत होईल. मात्र हे पाणी गटागटा न पिता थोडे थोडे आणि हळू प्यायला हवे. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढून तुम्हाला फ्रेश वाटण्यास मदत होईल. इतकेच नाही तर जास्त थकल्यासारखे वाटत असेल तर आठवणीने गुळाचा एक खडा खा. त्यामुळे तरतरी वाटण्यास निश्तित मदत होईल. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलफिटनेस टिप्स