Join us   

सतत हिरडीतून रक्त येते? हा आजार की गंभीर आजाराची लक्षणे? डॉक्टर सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 5:37 PM

Do bleeding gums always mean gum disease? हिरड्यातून सतत रक्त येत असेल तर दुर्लक्ष करू नका..

लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला दातांची समस्या सतावते. दात घासताना काही लोकांच्या हिरड्यांमधून रक्त निघते. ज्यामुळे त्यांना खाता - पिताना त्रास निर्माण होतो. दातांची ही समस्या सामान्य जरी असली तरी, याला दुर्लक्ष करता कामा नये. हिरड्यांमधून जर वारंवार रक्तस्त्राव होत असेल तर, याचं कारण शोधून त्यावर उपाय करणे गरजेचं आहे.

यासंदर्भात, नवी दिल्ली येथील डॉ. गुलाटी डेंटल क्लिनिकचे दंतचिकित्सक डॉ. वैभव गुलाटी सांगतात, ''आपले दात नियमित स्वच्छ करणे गरजेचं आहे. दात व्यवस्थित साफ न केल्यास टार्टर, प्लेक आणि घाण दातांमध्ये साचते. ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया तयार होतात. दातांमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग सुरू होतो. संसर्गामुळे हिरड्या सुजतात.

अशा स्थितीत ब्रश करताना हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो. काही परिस्थितीत हार्ड ब्रशमुळे देखील हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो. काही वेळेला ब्रश न करताही लोकांच्या हिरड्यांमधून रक्त येते, ही बाब बॅक्टेरिया वाढल्यावर घडते. याला पायरीया असे म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला जिंजिवाइटिस असे म्हणतात''(Do bleeding gums always mean gum disease?).

पायरीया कशामुळे होते?

डॉक्टर वैभव गुलाटी सांगतात, ''जेव्हा दात आणि हिरड्यांमध्ये जंतू जमा होतात, तेव्हा इन्फेक्शनमुळे रक्तस्त्राव सुरू होतो. ज्यामुळे तोंडाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होते. दात व्यवस्थित साफ न ​​करणे, नियमित ब्रश न करणे, पान-मसाला खाणे, आंबट पदार्थ जास्त खाणे, थंड-गरम पदार्थ खाणे यामुळे पायरिया होण्याचा धोका वाढतो.''

पावसाळ्यात हमखास पोट बिघडतं, ४ गोष्टींची काळजी घ्या नाहीतर पावसाळ्यात तब्येत बिघडणारच!

ब्लीडींग गमवर उपाय

डेंटिस्टच्या मते, ''हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी, योग्य प्रकारे ब्रश करणे आवश्यक आहे. ब्रश करताना मऊ ब्रशचा वापर करा. हळुवारपणे ब्रश केल्याने दात व्यवस्थित स्वच्छ होतात. जर असे केल्यानेही हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कष्टाने कमी केलेलं वजन पुन्हा भरभर वाढते? कारण तुम्ही करता ४ चुका..

यावर घरगुती उपाय म्हणून, आपण कोमट पाण्यात मीठ मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा गुळण्या करू शकता. मीठ अँटी-बॅक्टेरियल आहे. याशिवाय हळद, मीठ आणि मोहरीचे तेल मिसळून आपण हिरड्यांवर लावून मसाज करू शकता. या घरगुती उपायांचाही हिरड्यांवर चांगला परिणाम होतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सहोम रेमेडी