Join us   

जेवताना वरण किंवा डाळीसोबत अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, पोट हमखास बिघडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 3:09 PM

Do not eat 3 things while having lentils : जेवताना आपण नकळत चुकीचे कॉम्बिनेशन करत पदार्थ खातो आणि पोट-पचन बिघडते

उत्तम आरोग्यासाठी तज्ज्ञ आपल्याला संपूर्ण आहार घेण्याचा सल्ला देतात. संपूर्ण आहारात गहू, तांदूळ, ज्वारी, भाज्या आणि डाळींचा (Lentils) देखील समावेश असतो. डाळी अनेक प्रकारचे असतात. डाळीचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीराच्या स्नायू मजबूत होतात. यासह हाडांना देखील बळकटी मिळते.

परंतु, असे काही पदार्थ आहेत, जे डाळीसोबत खाणं टाळावे. असं केल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डाळीसोबत किंवा नंतर कोणते पदार्थ खाणं टाळावे? यामुळे आरोग्याला कोणती हानी पोहचू शकते? याची माहिती आपल्याला हवी(Do not eat 3 things while having lentils ).

डाळीसोबत किंवा डाळ खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावे?

दूध

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, 'डाळीसोबत किंवा डाळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नये. यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. खरं तर, दुधात असणारी प्रथिने, व डाळीतील प्रथिने मिळून आपल्या पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात. ज्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे डाळीसोबत दुधाचे सेवन टाळावे.

ग्लासभर दुधात घाला एक चमचा मध, सकाळी पोट साफ होण्याची समस्या टळेल, आरोग्यही सुधारेल

फळे

डाळीसोबत फळं खाऊ नये. कारण डाळ लवकर पचत नाही, ती पचायला वेळ घेते. अशावेळी आपण जर फळे खात असाल तर, याचा थेट परिणाम आतड्यांवर होऊ शकतो. कारण डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. तर फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे एकत्र पचण्यास दोघांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. अशा वेळी पोटाचे विकार वाढतात.

फक्त २० मिनिटं रोज चालायची तयारी आहे? पोट कमी करण्याची आणि फिटनेस वाढवण्याची सोपी युक्ती

गोड पदार्थ

काही लोकांना जेवण करताना गोड पदार्थ खाण्याची सवय असते. पण जेवणाच्या ताटात डाळ असेल तर, गोड पदार्थ खाणं टाळावे. कारण साखरेचे सेवन प्रोटीनसोबत करू नये. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात. यासह पोट फुगणे आणि ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य