Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात तळहाताची सालं निघतात? आग होते? करा सैंधव मीठ आणि गरम पाण्याचा ‘असरदार’ उपाय

हिवाळ्यात तळहाताची सालं निघतात? आग होते? करा सैंधव मीठ आणि गरम पाण्याचा ‘असरदार’ उपाय

Winter Home Remedy हिवाळ्यात बरेच जणांची स्कीन ड्राय - रुक्ष होते, बहुतांशवेळा डेड स्कीन देखील निघते. सैंधव मिठाचा करून पहा वापर, मिळेल उत्तम रिझल्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 02:08 PM2022-12-15T14:08:42+5:302022-12-15T14:09:07+5:30

Winter Home Remedy हिवाळ्यात बरेच जणांची स्कीन ड्राय - रुक्ष होते, बहुतांशवेळा डेड स्कीन देखील निघते. सैंधव मिठाचा करून पहा वापर, मिळेल उत्तम रिझल्ट..

Do palms peel off in winter? Was there a fire? Do the 'effective' remedy of Saindhava salt and hot water | हिवाळ्यात तळहाताची सालं निघतात? आग होते? करा सैंधव मीठ आणि गरम पाण्याचा ‘असरदार’ उपाय

हिवाळ्यात तळहाताची सालं निघतात? आग होते? करा सैंधव मीठ आणि गरम पाण्याचा ‘असरदार’ उपाय

हिवाळा हा थंड ऋतू प्रत्येकाला आवडतो. या ऋतूचे अनेक फायदे आहेत. तसेच नुकसान देखील आहे. हिवाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी पडू लागते. याने स्कीन प्रचंड ड्राय होते. यासह त्वचेतील सालं देखील निघायला सुरुवात होते. आपण पाहिलं असेल हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात. आणि ओठांची साले निघू लागतात. काही वेळा ओठातून रक्त देखील निघते. महागड्या प्रोडक्ट्स आणि मॉइश्चाराईजर लावून कोरडेपणा निघत नसेल, तर, एकदा घरच्या घरी सैंधव मीठ ट्राय करून पहा. हा घरगुती उपाय त्वचा मऊ, कोमल आणि तुकतुकीत होईल.

सैंधव मिठाचा करा असा वापर

यासाठी सैंधव मीठ - अर्धा कप आणि कोमट पाण्याची आवश्यकता आहे.

हिवाळ्यात हाताची त्वचा खूप कोरडी पडते. कोरडी पडल्यामुळे त्याची सालं देखील निघू लागतात. त्यासाठी सैंधव मीठ प्रभावी ठरेल. सर्वप्रथम एका भांड्यात कोमट पाणी घ्या, त्यात अर्धा कप सैंधव मीठ टाका. मीठ पाण्यात मिसळल्यानंतर त्यात आपले हात साधारण ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या. १० मिनिटे झाल्यानंतर हात चांगले कॉटनच्या टॉवेलने पुसून घ्या. त्यानंतर खोबरेल तेल अथवा पेट्रोलियम जेल लावून मॉइश्चाराईज करा.

उत्तम रिझल्टसाठी ही प्रक्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. असे केल्याने डेड स्कीन निघून जाण्यास मदत होईल. यासह त्वचा कोमल आणि चमकदार दिसेल.

Web Title: Do palms peel off in winter? Was there a fire? Do the 'effective' remedy of Saindhava salt and hot water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.