Join us   

तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिता? शरीरावर होतील ५ दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2022 4:52 PM

कॉफीचे विविध फायदे असले तरी रिकाम्या पोटी कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आरोग्यावर कोणते परिमाण होतात ते पाहूया

ठळक मुद्दे डायबिटीस होण्याची किंवा ज्यांना आहे त्यांच्या शरीरातील शुगरचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने शक्यतो कॉफी टाळलेली केव्हाही चांगली. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास ही खनिजे नष्ट होतात आणि शरीराला योग्य त्या खनिजांची कमतरता जाणवते.

भारतात सकाळी झोपेतून उठल्यावर आवर्जून चहा किंवा क़ॉफी प्यायली जाते. सकाळी सकाळी हातात गरमागरम चहा, कॉफी आली की झोप उडते आणि तरतरी येते म्हणून आपण हे रुटीन वर्षानुवर्षे फॉलो करत राहतो. इतकेच नाही तर सकाळी घरातून घाईघाईत काहीच न खाता पिता बाहेर पडलो की एखाद्या मिटींगच्या ठिकाणी किंवा ऑफीसमध्ये आपण थेट मग भरुन कॉफी पितो. कॉफी दुधाची असल्याने चहापेक्षा बरी असा आपला समज असतो. मात्र रिकाम्या पोटी कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. क़ॉफीचे हृदयरोगासाठी, व्यायामानंतर एनर्जी येण्यासाठी, अल्झायमरवरील उपाय म्हणून किंवा अगदी त्वचा चांगली होण्यासाठी विविध फायदे असले तरी रिकाम्या पोटी कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आरोग्यावर कोणते परिमाण होतात ते पाहूया

(Image : Google)

१. पचनाशी निगडीत तक्रारी 

कॉफी आपल्या पचनाच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणू शकते. तसेच रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास शरीरात अॅसिडची निर्मिती होते. त्यामुळे अपचन आणि छातीत आग होण्याची तक्रार उद्भवते. अशाप्रकारे नियमित रिकाम्यापोटी कॉफी पिणाऱ्यांना पचनाच्या तक्रारी उद्भवतात.

२. कोर्टीसोलची पातळी घटते 

आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आपले शरीर कोर्टीसाल नावाच्या हार्मोनची निर्मिती करते. या हार्मोनमुळे आपल्याला फ्रेश वाटण्यास मदत होते. पण याचवेळी आपण कॉफी प्यायली तर या हार्मोनवर परिणाम होऊन आपल्याला पुन्हा आळसावल्यासारखे होण्याची शक्यता असते. त्यामुळए रिकाम्या पोटी कॉफी पिण्याऐवजी दुपारच्या वेळी एखादी कॉफी प्यायलेली चालते. 

३. खनिजे नष्ट होण्यास कारणीभूत 

आपल्या शरीराचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी आपल्याला खनिजांची आवश्यकता असते. पण रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास ही खनिजे नष्ट होतात आणि शरीराला योग्य त्या खनिजांची कमतरता जाणवते. म्हणून रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे. 

(Image : Google)

४. शुगर लेव्हल वाढतात 

सकाळी उठल्या उठल्या कॉफी घेतल्याने इन्सुलिनची पातळी वाढण्याची शक्यता असते. यामुळे डायबिटीस होण्याची किंवा ज्यांना आहे त्यांच्या शरीरातील शुगरचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने शक्यतो कॉफी टाळलेली केव्हाही चांगली. 

५. भिती वाटते

सकाळी कॉफी पिणाऱ्यांमध्ये भितीचे प्रमाण जास्त असते. कॅफीनमुळे आपला फाईट किंवा फ्लाईट रिप्लाय उत्तेजित होतो. त्यामुळे आपल्यातील भितीचे प्रमाण वाढते आणि आपल्याला भितीचे अॅटॅकही येऊ शकतात. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलअन्न