घरी बनवलेलं अन्न खाणं, हे कधीही उत्तम. पण कधीतरी चवीत बदल म्हणून किंवा काही तरी चटकदार खावं वाटतं म्हणून आपण बऱ्याचदा रेडी टू इट (ready to eat food) प्रकारात मोडणारे पदार्थ, पाकिटबंद सूप असे पदार्थ खात असतो. पण या पदार्थांचं खाणं जर एका मर्यादेच्या बाहेर गेलं तर मात्र ते अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देऊन जीवघेणं ठरू शकतं, असं American Journal of Preventive Medicine या अभ्यासात सांगितलं आहे.
या संशोधनानुसार ब्राझील येथील लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासानुसार असं सांगण्यात आलं आहे की ब्राझीलमध्ये २०१९ साली जे काही प्रीमॅच्युअर किंवा टाळता येणं शक्य होतं, अशा पद्धतीचे मृत्यू झाले त्यात १० टक्क्यांपेक्षाही अधिक मृत्यू अशा पद्धतीच्या खाण्याच्या अतिरेकी प्रमाणामुळे झालेले आहेत.
नेकलेस डिझाईन ब्लाऊज पॅटर्न!! बघा १० आकर्षक पर्याय, असं ब्लाऊज असेल तर नेकलेसची गरजच नाही
वास्तविक पाहता इतर प्रगत देशांच्या तुलनेत ब्राझीलमध्ये असे पदार्थ खाणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी आहे. तरी देखील तिथे एवढ्या जास्त प्रमाणात मृत्यू झालेले असतील, तर प्रगत देशांनी याबाबत गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे, असंही या अभ्यासात सुचवलं आहे.
हे देखील जाणून घ्या
१. वरील अन्नपदार्थ हे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड या प्रकारात येतात. या प्रकारच्या अन्नामध्ये सोडियम, साखर, ट्रान्सफॅट, स्वीनटर बिव्हरेजेस यांचं प्रमाण खूप जास्त असतं. हे तब्येतीसाठी हानिकारक ठरतं, असं ब्राझील येथील University of Sao Paulo and Oswaldo Cruz Foundation चे अभ्यासक ए. एफ. निलसन यांनी सांगितलं.
२. पुढे सांगताना ते असंही म्हणाले आहेत की पदार्थ वारंवार खाणं आरोग्यासाठी निश्चितच धोकादायक आहे. पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा प्रीमॅच्युअर मृत्यू झाला, असं सांगणारा कोणताही ठोस अभ्यास आतापर्यंत समोर आलेला नाही.