काही जणांना थोडेही तिखट सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागते. नाक, कान लगेच लाल होतात. (Do you also love to eat spicy food all the time? But too much spicy food can be detrimental to your health.)साधी मिरचीही काहींना चरचरते तर काही जण बिनधास्त कच्च्या मिरच्या चाऊन खातात. कितीही तिखट खाण्याची सवय काहींना असते. त्यांना तिखट सोसते. (Do you also love to eat spicy food all the time? But too much spicy food can be detrimental to your health.)हा-हू असे काहीही आवाज न करता ते मस्त लाल भडक पदार्थ ही खातात. आपण भरपूर तिखट खातो या गोष्टीचा अनेकांना अभिमान वाटतो. मात्र असे अति तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अनेक प्रकारचे शारीरिक त्रास तिखट खाल्याने होऊ शकतात. हेल्थशॉट्स तसेच क्लेवरलँण्ड क्लिनिक हेल्थसारख्या साईट्सवर उपलब्ध असलेल्या मजकूरानुसार, अति मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्याने पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. विविध आजार उद्धवू शकतात.
१.अति तिखट खाल्याने पोटातील आम्ल वाढते. त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. एकदा का आम्लाचा त्रास सुरू झाला की मग सारख्या उलट्या होतात. पोटात दुखायला लागते. तसेच छातीत जळजळ सुरू होते. सारखे हे त्रास सहन करावे लागतात. पचन व्यवस्थित होत नाही. पचन न झाल्याने मळमळायला लागते. मग उलट्या डोकेदुखी असे त्रासही होतात.
२.तिखट खाल्याने जिभेच्या सहनशीलतेवर परिणाम होतो. जिभेवर फोड येतात. सतत तोंड येते. मग तिखट काय सगळेच पदार्थ खाताना फोड झोंबतात. अति तिखट खाल्याने जिभेची कार्यक्षमताही कमी होते.
३. तिखट खाताना डोळ्यातून पाणी येते. तसेच भरपूर घाम फुटतो. शरीराची ती प्रतिक्रिया असते. शरीर तिखट पचवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे घाम येतो. त्वचा लाल होते. तिखट खाल्याने चेहर्यावर पुरळ उठते. कारण तिखट पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात.
४. अति तिखट खाल्याने हृदयावरही परिणाम होऊ शकतो. तसेच गॅस्ट्रीक अल्सर होऊ शकतो. असे आजार फार महागात पडतात.
५. पाईल्स बद्दल तर सर्वांना माहिती आहे. अति तिखट खाल्याने पाईल्सचा त्रास होऊ शकतो. पाईल्स एकदा झाले की मग बसण्या-झोपण्याचेही वांदे होतात. तसेच हा आजार लगेच बरा होत नाही. फार त्रासदायक ठरतो.
६. आतड्यांना तिखटामुळे त्रास होतो. आतड्यांसाठी अति तिखट खाणे धोकादायक ठरु शकते. विविध विकार उद्धवतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा. प्रत्येक चव योग्य प्रमाणातच खावी.