हेल्दी राहण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं, याचे वेगवेगळे ट्रेण्ड नेहमीच येत असतात. यात कधी ताक पिऊन डाएट करायला सांगितलं जातं तर कधी वॉटर थेरपी दिलेली असते. प्रोटीन्सचे पदार्थ खा, कार्ब्स टाळा असेही बरेच ट्रेण्ड येत असतात. तसंच आता नाश्ता करणं टाळायचं आणि त्याऐवजी फळं खायची हा ट्रेण्ड आला आहे. पण हे खरच कितपत योग्य आहे. उपाशीपोटी काही फळं खाऊ नये हे आपण ऐकलेलं असतं (side effects of eating fruits as a breakfast). मग अशावेळी दिवसाची सुरुवात फळं खाऊन करावी का, याविषयी बघा तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...(is it okay to eat fruits first in the morning?)
नाश्ता टाळून फळं खाणं योग्य आहे का?
नाश्त्यामध्ये फक्त वेगवेगळी फळं खाल्ल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी my_ayurvedic_lif या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
केसांची टोकं कोरडी पडली- फाटे फुटले? ५ टिप्स, केस होतील मऊ-सिल्की आणि चमकदार
यामध्ये त्या असं सांगत आहेत की सकाळच्या वेळी तुमच्या शरीरातली कफ प्रकृती वाढलेली असते. तुमचा जठराग्नी खूप मंद असतो. अशा अवस्थेत जर तुम्ही थंड प्रकृती असणारी थंड फळं खाल्लं तर तुमचा जठराग्नी आणखीनच थंड आणि मंद होतो. यामुळळे मग पोट फुगणे, अस्वस्थता वाढणे, एनर्जी कमी होणे असा त्रास होऊ शकतो.
फळं खाल्ल्यानंतर काही वेळ तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. पण त्यानंतर काही वेळातच पुन्हा भूक लागते. नाश्ता टाळून फळं खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही वेळातच एनर्जी लेव्हल कमी झाल्यामुळे सतत काहीतरी गोडखाण्याची इच्छा होते.
६ चुका केल्या तर दात कायम पिवळेच दिसतात! चमकदार- स्वच्छ-पांढरेशुभ्र दात हवे तर.
याशिवाय थकवाही खूप लवकर येतो. त्यामुळेच उपाशीपोटी फळं खाणं टाळा. त्याऐवजी गरमगरम ताजं, शिजलेलं अन्न खाण्यास प्राधान्य द्या. फळं खाण्यासाठी नाश्ता आणि दुपारचं जेवण यामधला वेळ किंवा मग दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामधला वेळ राखून ठेवा, असं त्यांनी सुचवलं आहे.